घरमुंबईManoj Jarange : जरांगे यांनी जपून रहावे, प्रकाश आंबेडकर का म्हणाले असं...

Manoj Jarange : जरांगे यांनी जपून रहावे, प्रकाश आंबेडकर का म्हणाले असं ?

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस. मात्र, जरांगे यांनी तब्येतीला जपावं, त्यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे उपोषण सुरू आहे. जरांगे यांना दिली जाणारी औषधं, सलाईन, इंजेक्शन आणि जेवण तपासून द्या असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे आंबेडकर सांगतात. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं काय ?

“मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसत आहे. यामुळेच त्यांना जी काही औषधं, सलाईन, जेवण, ज्यूस दिला जात आहे, ते आधी तपासलं जावं. यानंतरच त्यांना या गोष्टी दिल्या जाव्यात. राज्य सरकार देखील याचा विचार करेल आणि त्याची व्यवस्था करेल अशी माझी अपेक्षा आहे,” असं आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, यापूर्वीही, प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना 10-15 लोकांमध्ये बसून जेवू नये असा सल्ला दिला होता. गर्दीसाठी जे जेवण येतं, तेच त्यांनी खावं असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा – Suraj Chavan On Awhad : दादांवर टीका करताना कुठला माल घेतला होता; सूरज चव्हाणांचा थेट सवाल

- Advertisement -

लोकसभा निवडणूक लढवा

प्रकाश आंबेडकरांनी मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा सल्ला दिला होता. स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही. याबाबत जनजागृती झाली आहे. आता आरक्षण मिळविणे हे ध्येय असावं, म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी.

दरम्यान, सकल मराठा समाजाचे समन्वयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले होते. कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे मुख्यमंत्री आणि मराठा समन्वयक यांच्यामध्ये बैठक झाली होती. बैठकीत मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आणि त्यांचे उपोषण सुटावं यासाठी सरकार काय प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा – Guhagar : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; बावनकुळेंनी काढले भास्कर जाधवांचे संस्कार

जरांगे यांनी काय इशारा दिला ?

सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी 20 तारखेपर्यंत करा, शिंदे समितीची मुदत 1 वर्ष वाढवा, आमच्यावर दाखल केलेले राज्यातील गुन्हे मागे घ्या. हे सरकारला करावंच लागेल अन्यथा 20 तारखेपासून पुढे सरकारने सरकारचं बघावं अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -