घरमुंबईGuhagar : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; बावनकुळेंनी काढले भास्कर जाधवांचे संस्कार

Guhagar : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; बावनकुळेंनी काढले भास्कर जाधवांचे संस्कार

Subscribe

मुंबई : राज्यातील राजकारण तापत असतानाच आज (16 फेब्रवारी) कोकणात ठाकरे गट आणि भाजपामध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपा नेते निलेश राणे यांचा ताफा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरून जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपा आमनेसामने आले असल्यामुळे गुहागरमध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे. याचसंदर्भात माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भास्कर जाधव संस्कार आणि संस्कृती सोडून वागत आहेत. (Guhagar Stone pelting on Nilesh Rane convoy Bhaskar Jadhav rites were removed by the Bawankules)

हेही वाचा – Jarange VS Bhujbal : छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावर जरांगेंनी एकेरी उल्लेख करत म्हटलं…

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना निलेश राणे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीसंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भास्कर जाधव हे नेहमी संस्कार आणि संस्कृती सोडून वागत असतात. ज्या पद्धतीने ते लोकांचे व्यगं करतात. राणे कुटुंबाबद्दल व्यक्तिगत स्वरुपाने ज्या पद्धतीने त्यांनी एका सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर टीका केली होती. आम्हाला अपेक्षा होती की, उद्धव ठाकरे त्या सभेमध्ये भास्कर जाधव यांना राणे कुटुंबावर टीका करण्यापासून थांबवतील आणि असे संस्कार नाहीत हे त्यांना सांगतील. पण उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर त्यांना रोखले नाही. त्यानंतर राणे आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये वाद निर्माण झाला असला तरी रॅली काढण्याचा आमचा अधिकार आहे. तशी परवानगी घेतली असावी. पण चिपळूणमध्ये काय राडा झाला असेल, त्याचा अभ्यास करावा लागेल किंवा मला त्याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल. पण सुरुवात मात्र भास्कर जाधव यांनी केली आहे, हे मी स्पष्ट करतो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – Ajit Pawar : मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता! अजितदादांचे कार्यकर्त्यांना ‘हे’ आदेश

- Advertisement -

तुम्ही जसं वागाल तसं लोकं वागतील

नितेश राणे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात, तर तुम्ही त्यांना कधी समज देण्याचा प्रयत्न केला का? या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात त्याचे उत्तर देण्याचं काम नितेश राणे करतात. जर संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांना समज दिली, तर मी नितेश राणे यांना समज देईल. संजय राऊत सकाळी 9 वाजता सुरुवात करतात. उद्धव ठाकरे यांनी त्यांची काळजी घ्यावी, आम्ही आमची काळजी घेऊ. त्यामुळे सुरुवात कुठुन होते, हे बघितलं पाहिजे. सामनातून सकाळी सुरुवात होते, मग ट्वीट होते. पंतप्रधानांवरही अत्यंत वाईट शब्दात टीका होते. त्यामुळे तुम्ही जसं वागाल तसं लोकं वागतील. मी पक्ष माझ्या लेव्हलला चौकशी करेल, पण सुरुवात मात्र भास्कर जाधव यांनी केली आहे, असे बावनकुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -