घरमुंबईआदिवासी भागातील विकास प्रकल्पाच्या मुख्य सेविकांची पदे रिक्तच!

आदिवासी भागातील विकास प्रकल्पाच्या मुख्य सेविकांची पदे रिक्तच!

Subscribe

वाडा तालुक्यातील पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील मुख्य सेविकांची अनेक पदे रिक्तच आहेत. त्याचा विपरित परिणाम कुपोषण निर्मूलनाच्या कामावर होत आहे. या गंभीर विषयाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

वाडा तालुक्यातील पंचायत समितीच्या एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्पाचे दोन बीट कार्यरत आहेत. कुडूस -२७१ आणि वाडा – १३९ या दोन प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या येतात. तालुक्यातील व पालघर जिल्ह्यातील कुपोषण नियंत्रण आणण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. मात्र मुख्य सेविकांच्या रिक्त पदामुळे कार्यालयातील कामकाजाचा बोजा इतर मुख्यसेविकेच्या मदतीने पूर्ण करावा लागतो.

- Advertisement -

वाडा तालुक्यातील वाडा प्रकल्पातंर्गत चार मुख्य सेविकांची गरज असताना फक्त एकाच मुख्य सेविकेला काम पहावे लागते. यातच या प्रकल्पांतर्गत अतिदुर्गम भागातील उजैनी, आखाडा, मांगरूळ, पाचघर, परळी, ओगदा, गारंगाव अशी आदिवासी समाज बहूल गावपाडे येतात. त्याचप्रमाणे वाडा शहारालगतची गावेही यात समाविष्ट आहेत. अतिदुर्गम भागातील अंगणवाड्यांना भेटी देणे, कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचाही बोजा असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

वाडा प्रकल्पांतर्गत ४ मुख्य सेविकेच्या गरज असताना येथे एकच मुख्य सेविका काम करते. तर कुडूस प्रकल्पात खानिवली, पालसई, कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रे येतात. येथे ९ पदाची गरज असताना तेथे ७ पदे कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. वाडा प्रकल्पात पदांची मागणी पंचायत समितीच्या सदस्यांकडून मासिक सभेतून वारंवार होते. तसेच या विषयी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करूनही ही समस्या सुटत नाही. वाडा तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी ही पदे तातडीने भरण्याची मागणी जनतेकडून केली जाते.

- Advertisement -

अतिदुर्गम भागातील मुख्य सेविकांना अंगणवाडींना भेटी देणे त्यातच अतिरिक्त कामाचा बोजाही असतो. तरी आवश्यकतेप्रमाणे पदे भरण्यात यावीत.

साक्षी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्याधिकाऱ्यांकडे रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली आहे.

गोरक्ष खोसे, एकात्मिक महिला व बाल विकास, वाडा प्रकल्प

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -