घरमुंबईकोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य - भांडारी

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य – भांडारी

Subscribe

कोयना धरणातील बाधित प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास आपला अग्रक्रम राहील, असे आश्वासन माधव भंडारी यांनी दिनांक १४ मे रोजी गडकरी रंगायतन येथे उपस्थित कोयना प्रकल्पग्रस्त खातेधारकांना दिले. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल जनजागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कोयना प्रकल्पग्रस्त खातेधारक आणि जनजागर प्रतिष्ठानच्या समन्वयक सेजल कदम यांच्यासह आमदार नरेंद्र पाटील, आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहरअध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक संजय वाघुले, आदी मान्यवर उपस्थित होते.

कोयना धरणामध्ये बाधित झालेल्या गावांची संख्या आजपर्यंत आपणास १०८ सांगण्यात आली आहे. मात्र आम्ही सर्व्हे केल्यानंतर आम्हाला ही संख्या ९८ असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा अर्थ सरकारला या प्रकल्पात किती गावे विस्थापित झाली हेदेखील अद्याप कळले नव्हते. शिवाय यात २१ हजार ९७७ खातेदार आहेत.

- Advertisement -

ही सर्व माहिती मिळवण्यासाठी आम्हाला केवळ तीन महिन्याचा अवधी लागला. मात्र आधीच्या शासनाकडे ही माहिती उपलब्धच नव्हती. आज ६३ वर्षे होऊनही या प्रकल्पग्रस्थांना न्याय मिळालेला नाही. आम्ही काही महिन्यातच या कामाला गती दिली आणि मागील महिन्यात सुमारे ८० कोटी रुपयांचे खातेदारांना वाटप केले आणि उर्वरित प्रकल्पग्रस्तांनाही लवकरच न्याय मिळवून देऊ. कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळाल्यावर कोयना प्रगल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचे काम हाती घेतले आहे. १८ नागरी सुविधा गावात नक्कीच पूर्ण केल्या जातील असे शेवटी भंडारे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -