घरमहाराष्ट्रपत्नीवरील संशयातून नवऱ्याने बेडरूममध्ये लावला कॅमेरा!

पत्नीवरील संशयातून नवऱ्याने बेडरूममध्ये लावला कॅमेरा!

Subscribe

पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी एका घटस्फोटित नवऱ्याने पत्नीच्या बेडरुममध्ये स्पाय कॅमेरा लावला. हा कॅमेरा त्याने खोलीतल्या वॉटर प्युरिफायरच्या मशिनला लावला होता. पत्नीला या कृत्याची माहिती होताच तिने पोलीस स्थानकात आपल्या घटस्फोटित पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पुण्याच्या वानवडी पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा काला यांनी सांगितले की, ते दोघे पती-पत्नी पुण्याच्या एका प्रतिष्ठित भागातील इमारतीत राहत होते. त्यांना बारा वर्षांचा मुलगा आहे. महिला ही पेशाने इंजिनिअर आहे. काही दिवसांसाठी त्या महिलेचा पती कामानिमित्ताने विदेशात राहायला गेला होता. विदेशातून आल्यानंतर ते पुन्हा सोबत राहू लागले.

- Advertisement -

महिलेने सांगितले की, पती विदेशातून आल्यानंतर आठ महिने ते दोघे सोबत राहिले. परंतु, त्यांचं एकमेकांशी जमत नव्हतं. खूप भांडणं होत होती. पती आपल्याकडे सतत संशयाच्या नजरेने बघत असायचा. त्यामुळे दोघांमध्ये मारामारीही झाली. अखेर ही घटना कोर्टात पोहोचून घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर पती आपल्या आई-वडिलांसोबत बंगळुरूला राहायला गेला. परंतु, आपल्या मुलाला भेटण्याच्या नावाने तो त्या महिलेच्या घरी जात असे. एके दिवशी त्याने पत्नीच्या बेडरुमध्ये स्पाय कॅमेरा लावला. त्या कॅमेराला त्याने आपल्या मोबाईलशी लिंक केले. एके दिवशी कपडे बदलताना महिलेला तो कॅमेरा नजरेस पडला. आणि अखेर तिने वैतागून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -