घरCORONA UPDATECorona: भाजीपाला दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय!

Corona: भाजीपाला दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय!

Subscribe

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, याचे परिणाम सगळीकडे पहायला मिळत आहेत. याच कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदा राज्यात मंत्रिमंडळ बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे मंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲड. अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्यातून या बैठकीत सहभागी झाले होते.

दरम्यान, यावेळीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलद चाचणीची गरज जिथे जिथे आहे तिथे प्राधान्याने करण्यात येईल असे सांगितले. तसेच होमगार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. भाजीपाला आणि इतर आवश्यक दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

लॉकडाऊनचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल!

दरम्यान, १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरीत अशा ५.५० लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

अशी आहे राज्याची सद्यस्थिती…

  • महाराष्ट्रात सध्या 868 रुग्ण असून, त्यापैकी ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे ५.९९ इतका आहे. मरण पावलेल्या ११ रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.
  • एकूण १७,५६३ नमुने तपासले असून त्यातले १५,८०८ निगेटिव्ह आहेत.
  • महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
  • मुंबईमध्ये सर्वाधिक ५२५ रुग्ण असून ३४ मृत्यू आहेत. त्या खालोखाल पुणे येथे १३१ रुग्ण आणि ५ मृत्यू तसेच ठाणे विभागात ८२ रुग्ण आणि ५ मृत्यू आहेत.
  • महाराष्ट्रातील एकंदर ११ कोटी १९ लाख ६६ हजार ६३७ लोकसंख्येपैकी ८६८ कोरोनाचे रुग्ण आढळले असून प्रत्येक १० हजार लोकसंख्येमागे ०.०७७ असे रुग्ण आहेत.
  • आढळलेल्या रुग्णांमध्ये ६३ टक्के पुरुष आणि ३७ टक्के महिला आहेत. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३९.७५ टक्के पुरुष आणि १३.२५ टक्के महिला आहेत.
  • दहाव्या आठवड्यात भारतात ४१२५ रुग्ण आढळले. इतर देशांची दहाव्या आठवड्यातील तुलना केली तर अमेरिकेत १ लाख २२ हजार ६५३, फान्समध्ये ३७ हजार १४५, जपानमध्ये १ हजार ६९३ आणि चीनमध्ये ८१ हजार ६०१ अशी आकडेवारी आहे.
  • सध्या राज्यात ३ लाख २ हजार ७९५ एन-95 मास्क, ४१ हजार ४०० पीपीई, १० हजार ३१७ आयसोलेशन बेड, २ हजार ६६६ आयसीयू बेड आणि १ हजार ३१७ व्हेंटिलेटर्स आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -