घरCORONA UPDATEपीपीई साहित्याच्या उपलब्धतेसाठी आयआयटी मुंबईचा पुढाकार!

पीपीई साहित्याच्या उपलब्धतेसाठी आयआयटी मुंबईचा पुढाकार!

Subscribe

आयआयटीकडून पीपीईसाठी संकेतस्थळ, पीपीईच्या टंचाईची मिळणार माहिती

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी व प्राध्यापकांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका हॉस्पिटलला मास्क आणि ग्लोव्हजसारखी वैयक्तिक सुरक्षेची संसाधने (पीपीई) उपलब्ध करून दिली होती. आयआयटी मुंबईतून मिळालेल्या प्रतिसादामुळे आता आयआयटी मुंबई देशभरातून पीपीई साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी संकेतस्थळ सुरू केले आहे.

कोरोनाचा सामना करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, हॉस्पिटलमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना मास्क, ग्लोव्हज आणि गाऊन यासारखी वैयक्तिक सुरक्षेसाठी आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध होत नसल्याने त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पीपीई उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पीपीईचा उपलब्ध साठा, गरज असलेली ठिकाणे, टंचाईमुळे कर्मचाऱ्यांना करावा लागत असलेला सामना, पीपीईचे उतपादन आणि वितरकांची माहिती तसेच पीपीई उपलब्ध करून देणाऱ्या दात्यांची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी यासाठी आयआयटी मुंबईकडून पीपीईबाबत सर्व माहिती उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ सुरू केले आहे. https://www.ppecovid.in/ या संकेतस्थळावरून एखाद्या दात्याला पीपीईची आवश्यकता कोठे अधिक आहे आणि आपल्याला कोठे दान करता येऊ शकते याची, तसेच एखाद्या हॉस्पिटलला कोणते दाते पीपीई उपलब्ध करून देऊ शकतात याची माहिती सहज मिळणार आहे.

- Advertisement -

या मोहिमेमध्ये आयआयटी हैदराबादने सहकार्याचा हात पुढे केला आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी व मास्क, ग्लोव्हज सारखी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी मुंबईकडून 500 पेक्षा अधिक गट व स्वयंसेवक तयार केलंले आहेत. या मध्ये सहभागी होण्यासाठी https://www.covidindiainitiative.org हे संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे.

सध्या लॉकडाऊन असल्याने अनेक  कॉलेज, उच्च शैक्षणिक संस्थांमधील केमिकल, केमिस्ट्री, बायोलॉजी लॅब, टेस्टिंग लॅब, डेंटल हॉस्पिटल, इंडिस्ट्रीज बंद आहेत. त्यामुळे येथे वापरात येणारे मास्क, ग्लोव्हज मिळवण्यासाठी आयआयटी मुंबईचे स्वयंसेवक प्रयत्न करत आहेत. तसेच पीपीईचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी स्वस्त दरात हे साहित्य उपलब्ध करून द्यावेत यासाठी आयआयटी मुंबई प्रयत्नशील आहे. आयआयटी मुंबईकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची माहिती यूट्यूबवरही उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -