घरमुंबईLockDown: मेट्रोपोलिटन शहरात आता होम डिलिव्हरी!

LockDown: मेट्रोपोलिटन शहरात आता होम डिलिव्हरी!

Subscribe

ब्रिटानिया इंडस्ट्रीजने आपल्या सर्व उत्पादनांच्या डिलिव्हरीसाठी डूनझो या ऑन-डिमांड ई-कॉमर्स पोर्टलसोबत केली भागीदारी

जीवनावश्यक वस्तूंचा अखंडित पुरवठा तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी ब्रिटानिया इंडस्ट्रीजने आपल्या सर्व उत्पादनांच्या डिलिव्हरीसाठी डूनझो या ऑन-डिमांड ई-कॉमर्स पोर्टलसोबत भागीदारी केली आहे. ग्राहकांना डूनझो अॅपवर ‘ब्रिटानिया इसेंशिअल’ स्टोअरच्या माध्यमातून ब्रिटानियाची उत्पादने ऑर्डर करता येतील आणि तासाभरात ती त्यांना मिळतीलही.

डूनझोच्या नो-कॉण्टॅक्ट डिलिव्हरीमुळे ब्रिटानियाची बिस्किटे, केक, रस्क, क्रॉसॉन, मिल्कशेक्स, वेफर्स, घी आणि डेरी व्हाईटनर यासारखी उत्पादने मुंबई, पुणे, दिल्ली, गुरगाव, जयपूर, बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई येथील ग्राहकांपर्यंत सुरक्षित पद्धतीने पोहोचतील. बंगळुरुत मंगळवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही उत्पादने ब्रिटानियाच्या डिस्ट्रिब्युशन सेंटर्समध्ये उपलब्ध असतील आणि या पीओएसमधून (पॉईंट ऑफ सेल) डूनझो ती ग्राहकांपर्यंत पोहोचती करण्यात येतील.

फ्लिपकार्ट – उबरची भागिदारी

फ्लिपकार्ट आणि उबेर यांनी सध्या देशपातळीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली येथील लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भागिदारीची घोषणा केली आहे. या भागिदारीमुळे अत्यंत महत्त्वाच्या अशा पुरवठा साखळ्या सुरू ठेवणे शक्य होणार असून फ्लिपकार्ट ग्राहकांच्या जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्याबाबतच्या वाढत्या गरजा भागवता येणार आहेत. त्याचबरोबर कोव्हिड-१९चा प्रसार थांबवण्यासाठी करोडो भारतीयांनी घरातच राहावे, हे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासही त्यामुळे हातभार लागणार आहे.


आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी ‘उबर’चा पुढाकार; १५० गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -