घरमुंबईVIDEO : जेवणाचा डबा धुण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आला, अन् लोकलच्या धडकेनं सर्वच संपलं

VIDEO : जेवणाचा डबा धुण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आला, अन् लोकलच्या धडकेनं सर्वच संपलं

Subscribe

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विविध उद्घोषणा करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जागृतही केली जाते. परंतु प्रवासी या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात रेल्वे पटली ओलांडणे किंवा दरवाजावर उभे राहून प्रवास करताना दिसतात. तर काही वेळेला रेल्वेमध्ये चढताना हात निसटणं, पाय घसरणं किंवा अनेक वेळा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होताना दिसतात. अशीच एक दुर्दैवी घटना मालाड रेल्वे स्टेशनवर घडली आहे. स्टेशनवरील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. (VIDEO The lunch box came to the platform for washing and it was all over with the impact of the local)

हेही वाचा – Buldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

- Advertisement -

सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, मुंबईच्या मालाड रेल्वे सटेशनवरील प्लॅटफॉर्म तीनवर दोन तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील कट्ट्यावर बसून डबा खातात. एकत्र जेवण केल्यानंतर ते दोघंही जेवणाचा डबा आणि हात धुण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या कडेला जातात. तिथे उभे असताना अचानक चर्चगेटच्या दिशेहून बोरिवलीकडे जाणारी एसी जलद लोकल येते. यावेळी एक तरुण लोकल पाहून बाजूला होतो, मात्र दुसऱ्या तरुणाला काही कळायच्या आतच त्याला लोकलची जोरदार धडक बसते आणि प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला जातो. त्याच्या कानातून रक्तस्त्राव सुरू होतो. त्यामुळे त्याला उपचारासाठी कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही दुर्दैवी घटना 17 जून रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.

हेही वाचा – LPG Price : गॅस सिलिंडरच्या नवे दर जाहीर, जाणून घ्या स्वस्त झाला की महाग

- Advertisement -

ईएमयूचा डबा रुळावरून घसरल्याने मुंबईत मोठा अपघात टळला

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेवरील अंबरनाथ रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रिकल मल्टीपल युनिट (EMU) चा रिकामा रेक रुळावरून घसरला होता. मात्र, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नव्हती. 18 जून रोजी  सकाळी 8.25 मिनिटांनी मुंबईतील अंबरनाथ रेल्वे स्थानकावर EMU चा रिकामा रेक रुळावरून घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -