घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरBuldhana Bus Accident : 'या' कारणांमुळे समृद्धी महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ?

Buldhana Bus Accident : ‘या’ कारणांमुळे समृद्धी महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ?

Subscribe

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदेखड राजा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. सध्या अपघातस्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करत आहेत. मात्र समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर अनेक सुधारणा आणि उपाययोजना बाकी असल्याची बाबी समोर आल्या आहेत.

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदेखड राजा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. सध्या अपघातस्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करत आहेत. मात्र समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर अनेक सुधारणा आणि उपाययोजना बाकी असल्याची बाबी समोर आल्या आहेत. (budhana bus accident investigation report samriddhi highway)

अपघाताची मुख्य कारणं कोणती?

- Advertisement -

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून वारंवार होणाऱ्या अपघातामागे अतिवेग, नादूरुस्त वाहने, झिजलेली टायर ही तीन प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. मात्र बुलढाणा येथे झालेल्या अपघातानंतर राजकीय नेत्यांनी अनेक कारणं सांगितली आहेत.

  • राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
  • विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते असे सांगितले.
  • याप्रकरणी चालकाची चौकशी सुरू असून अधिक तपास सुरू आहे. त्यानंतरच टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे की नाही, हे स्पष्ट होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कारवाई आणि यंत्रणा

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर वाहने आणण्यापूर्वी राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक वाहनांच्या चाकाची तपासणी करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार, झिजलेले टायर असल्यास वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला. पण, प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याने किंवा आहे ती यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसत आहे.

रस्ता सरळ आणि मध्यरात्री चालकांना लागते डुलकी

चालकाला डुलकी लागल्याने बुलडाणा येथे भीषण अपघात झाला असावा, अशी शक्यता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. “राज्यात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे झाला, त्यावेळीही सुरुवातीला मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेले अपघात हे रात्री व पहाटेच्या दरम्यान झालेले आहेत. अनेकदा या वेळेत चालकाला डुलकी येते. त्यात ठरवून दिलेल्या मर्यादापेक्षा वाहनांचा वेग असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे होणारे अपघात हे अत्यंत भीषण असतात. समृद्धी महामार्गावर एवढ्या वेगाने जी वाहने चालवली जातात तीदेखील या वेगासाठी योग्य नसतात”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वेगमर्यादेचे उल्लंघन

“वाहनांचा वेग चालकांनी ठरवून दिलेल्या मर्यादेतच ठेवावा, यासाठी चालकांचे प्रबोधन करावे लागणार आहे. वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गावर कॅमेरे लावण्यात येणार आहे. एखादे वाहन अधिक वेगाने धावत असल्याचे दिसून येताच त्या वाहनाला तशी सूचना देणारी स्मार्ट यंत्रणा समृद्धी महामार्गावर बसवावी लागणार आहे. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत हे सर्व मॅन्युअली करावे लागणार आहे. वाहने टोलनाक्यावर येतात तेव्हा देखील चालकांचे प्रबोधन करण्याबाबत आता उपाययोजना आखल्या जातील”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गात काहीही दोष नाही

“समृद्धी महामार्ग चुकीच्या पद्धतीने बांधला आहे, म्हणून अपघात होत आहेत, असे नाही. आतापर्यंतच्या एकाही अपघातात असे आढळलेले नाही. मानवी चुकांमुळे दुर्दैवी अपघात होत आहेत. विशेष म्हणजे रात्री लांब प्रवास करणाऱ्या वाहनांमध्ये दोन चालक असणे आवश्यक आहे. जेणेकरून थकल्यास एकाला विश्रांती घेता येईल, तोपर्यंत दुसरा चालक वाहन चालवेल. मात्र, आतापर्यंत अनेकजण याचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आता विशेष उपाययोजना राबवल्या जातील”, असेही फडणवीसांनी सांगितले.

आतापर्यंत 950हून अधिक अपघात

समृद्धी महामार्ग सुरू होऊन जवळपास 6 महिने झाले असून इतक्या कमी कालावधीत या महामार्गावर 950 हून अधिक अपघात झालेल आहेत. अपघातातील मृतांची संख्याही 70च्या आसपास आहे. तसेच, काही अपघातांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळला महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

या उपाययोजना सुरू होणार

  • वेगाचे उल्लंघन करणार्‍या लेन, वाहन चालकांना टायरबाबतच्या माहितीसाठी 8 ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
  • रस्ता सुरक्षाबाबत माहिती देणारे फलक अधिक प्रमाणात लावण्यात येणार आहे.
  • सर्वे टोल नाक्यावर PA system सुरू करणे करणार. यात ध्वनिपेक्षकद्वारे वाहनचालकांना माहिती दिली जाईल.
  • अवजड वाहनांच्या चालकांच्या विश्रांतीसाठी पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -