घरमनोरंजनAmey Wagh: "पाठीमागे वाईट बोलणाऱ्यांसाठी आरसा",अमेय वाघने मारला नेटकऱ्यांना टोमणा !

Amey Wagh: “पाठीमागे वाईट बोलणाऱ्यांसाठी आरसा”,अमेय वाघने मारला नेटकऱ्यांना टोमणा !

Subscribe

मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता अमेय वाघ हा त्याच्या हटके अभिनयासाठी प्रसिद्ध आहे त्याच प्रकारे त्याच्या हजरजबाबीपणा साठी देखील चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो नेहमीच सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद करतो. काही दिवसांपूर्वी अमेय वाघचा ‘झोंबिवली’ हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून सिनेमाच्या दुसऱ्या भागाची वाट प्रेक्षक पाहत आहेत आणि या संबधीत अनेकदा विचारणा देखील केली जातेय. नाटक असो किंवा सिनेमा यासह वेब सीरिजमार्फत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अमेय वाघची एक पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतेय. मात्र यावेळी त्याने लिहलेल्या कॅप्शनने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

एखाद्या गोष्टीवरून ट्रोल होणं ही बाब आता कलाकारांसाठी देखील नवी राहीली नाहीये. या न् त्या कारणांवरून कलाकार हे ट्रोलिंगचा शिकार होत असतात. मात्र अनेक कलाकारांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे मानसिक त्रासाला देखील सामोर जावं लागलं आहे तर दुसरीकडे याला अनेक कलाकार सडेतोड प्रत्युत्तर देतात. सोशल मीडिया हे व्यक्त होण्याच मोठं माध्यम जरी असलं तरी कलाकार हे ट्रोलिंग करण्यासाठी सॉफ्ट टार्गेट असतात. नुकंतच अमेयने शेयर केलेल्या एका पोस्टच्या माध्यामातून त्याने नाव न घेता ट्रोलर्सवर निशाणा साधत टोमण्यातून उत्तर दिलंय. त्याने आरशासमोर एक फोटो काढून पोस्ट केलाय आणि त्याला भन्नाट कॅप्शन दिलंय

 

View this post on Instagram

 

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

- Advertisement -

‘माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत त्यांना आरसा !’ अमेयने लिहलेल्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आहे. अमेयच्या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. यासह त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच कौतुकही केलंय.

- Advertisement -

हे हि वाचा – आमिर खान फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या होता विचारात; पण पत्नी आणि मुलीसाठी बदलला निर्णय

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -