घरलाईफस्टाईलआयुर्वेदानुसार मातीच्या भांड्यातील पाणी का प्यावे? जाणून घ्या फायदे..

आयुर्वेदानुसार मातीच्या भांड्यातील पाणी का प्यावे? जाणून घ्या फायदे..

Subscribe

मातीच्या भांड्याला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रांतून भांड्यातील पाणी पाझरते. पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते, ज्यामुळे मातीचे भाडे आणि पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड होते. माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले असल्यामुळे ते पाणी पिण्याने कोणत्याही आरोग्यसमस्या होत नाहीत.

आयुर्वेदात मातीच्या भांड्यात पाणी पिणे आणि मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. परंतु आताच्या बदलत्या काळात मातीच्या भांड्याची जागा फ्रिजने घेतली असली तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून फ्रिजमधील पाण्यामध्ये आपल्याला मातीच्या भांड्याइतकी पोषकतत्त्वे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात फ्रिजमधील पाणी पिण्यापेक्षा मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने आपल्याला त्याचे अनेक आरोग्यकारी फायदे मिळू शकतात. ज्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता शिवाय तुमची पचनक्रियाही मजबूत होऊ शकते.

- Advertisement -

मातीच्या भांड्यातील पाणी कसे थंड होते?
मातीच्या भांड्याला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रांतून भांड्यातील पाणी पाझरते. पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते, ज्यामुळे मातीचे भाडे आणि पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड होते. माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले असल्यामुळे ते पाणी पिण्याने कोणत्याही आरोग्यसमस्या होत नाहीत.

मातीच्या भांड्यातले पाणी पिण्याचे फायदे

- Advertisement -

घशाला होईल फायदा
मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने घशाला त्याचा फायदा होऊ शकतो, कारण घशाच्या पेशींचे तापमान या पाण्याच्या सेवनाने अचानक कमी होत नाही परंतु फ्रिजचे पाणी प्यायल्याने घशाच्या पेशींचे तापमान अचानक कमी होते. ज्यामुळे तुमचा घसा खवखवतो परंतु भांड्यातल्या पाण्याने घशाला कोणताही त्रास होत नाही.

उष्माघात टाळण्यास उपयुक्त
मातीच्या भांड्यांमध्ये साठवलेल्या पाण्यात असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरातील ग्लुकोजची पातळी राखण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील उष्माघाताचा धोका कमी होतो.

गॅसच्या समस्येपासून आराम
मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते, जर एखाद्या व्यक्तीला गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या असेल तर भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर ठरेल.

ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर
मातीच्या भांड्यातील पाणी देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. विशेष म्हणजे खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून ते हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी करते.

त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो
मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या जसे की फोड, पुरळ, मुरुम यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचाही चमकदार होते.

गरोदरपणात फायदेशीर
गर्भवती स्त्रियांना फ्रिजमधील थंड पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही. त्यांना घागरी किंवा मातीच्या भांड्यातून पाणी प्यायला सांगितले जाते. त्यात ठेवलेले पाणी त्यांच्या आरोग्यासाठी तर चांगले असते.


हेही वाचा :उन्हाळ्यामध्ये ताक पिण्याचे ५ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -