घरमुंबई'शिवस्मारक कसं असावं आम्हीच ठरवणार'

‘शिवस्मारक कसं असावं आम्हीच ठरवणार’

Subscribe

याआधीही पुतळ्याची उंची, त्याचा विस्तार त्यासाठी लागणारा खर्च अशा अनेक मुद्द्यांवरुन शिवस्मारक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

अरबी समुद्रात उभारले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आजवर अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहे. या शिवस्मारकामुळे नेहमीच काही ना काहीतरी राजकीय वाद तसेच आरोप-प्रत्यारोपांचे खेळ रंगले आहेत. शिवस्मारकाच्या रचनेपासून ते पुतळ्याच्या उंचीपर्यंत सर्वच गोष्टी सातत्याने चर्चिल्या गेल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी आज एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वरूढ असावा की उभ्या स्वरुपात असावा? या मुद्द्यावर आज सकाळपासून घमासान चर्चा सुरु होती. याप्रकरणी विविध लोक आपले मत नोंदवत असल्यामुळे हा विषय अधिकच चिघळला गेला. दरम्यान, या चर्चेवर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारक समितीची भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले मेटे?

  • मुख्यमंत्र्यांची हाय पाँवर कमिटी,तांत्रिक समिती आणि शिवस्मारक समिती अशा तीन जणांचा समावेश शिवस्मारकासाठी आहे.
  • शिवाजी महाराजांचा पुतळा हा घोड्यावरचाचं हवा. मात्र, तो सँट्च्यु आँफ युनिटीसारखा पुतळा हवा की नाही यासंदर्भात अजून काही निर्णय झाला नाही
  • काही मनमानी आधिकाऱ्यांमार्फत हा प्रकार सुरू आहे
  • शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि तांत्रिक समितीचे अध्यक्ष यांच्यातील विसंवाद यानिमित्ताने उघड झाला आहे
  • शिवाजी महाराजांचा पुतळा हा अश्वरूढचं असेलं. जर काही बदल करायचा असेल तर तो आमच्या सहमतीनेचं होईल

दरम्यान, शिवाजी महारांजाचे हे स्मारक त्याच्या पायाभरणीपासूनच चर्चेत राहिलं आहे. स्मारकाच्या पायाभरणीसाठी समुद्रात गेलेली एका बोटीला अपघात झाला होता. ज्यामध्ये एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले होते. या अपघातामुळे शिवस्मारकचा मुद्दा पुढील काही काळासाठी अक्षरश: चघळला गेला. पायाभरणीच्यावेळी घडलेल्या अपघाताला जबाबदार कोण? या प्रश्नावरुन राजकीय वर्तुळात वाद सुरु झाले होते. त्याआधी आणि त्यानंतरही पुतळ्याची उंची, त्याचा विस्तार त्यासाठी लागणारा खर्च अशा अनेक मुद्द्यांवरुन शिवस्मारक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अशातच आता या नव्या प्रश्नावरुन पुन्हा एकाद स्मारकाच्या बांधणीचे काम पुढे ढकलले जाण्याची चिन्ह दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -