घरमुंबईठाणे महापालिकेच्या शिक्षकांसाठी विशाखा समिती

ठाणे महापालिकेच्या शिक्षकांसाठी विशाखा समिती

Subscribe

महाराष्ट्र नागरी सेवानियम, मानसिक आरोग्य विषयांचे प्रशिक्षण

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शिक्षकांसाठी विशाखा समिती, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, शाळेतील विद्यार्थ्यांच्या भावनिक समायोजनाकरिता मानसिक आरोग्य तसेच प्रेरणादायी जीवन आदी विषयांबाबत पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाला महापालिका शाळांतील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या निर्देशान्वये ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील शिक्षण विभागाकडील पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील सर्व शिक्षकांना ठामपा प्रशासनाच्यावतीने दिनांक 14 ते 25 नोव्हेंबर 2019 रोजी पर्यंत एकूण 927 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. विशाखा समिती, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, प्रेरणादायी जीवन, शाळेतील विद्यार्थ्यांच्या भावनिक समायोजनाकरिता मानसिक आरोग्य आदी विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दिनांक 25 नोव्हेंबर 2019 रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता झाली. महापालिका अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या सांगता समारंभास उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उप आयुक्त वर्षा दिक्षित, प्रोजेक्ट मुंबईचे संचालक शिशिर जोशी, शहापूर वन प्रशिक्षण संस्थेचे संचालक सी.एस.कांबळे, यशदाचे प्राविण्य प्रशिक्षक घनश्याम महाजन, आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -