घरमुंबईVoter Registration : विशेष मतदार नोंदणी मोहिमेला गती; मुंबई महापालिकेची मिळणार साथ

Voter Registration : विशेष मतदार नोंदणी मोहिमेला गती; मुंबई महापालिकेची मिळणार साथ

Subscribe

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी (13 फेब्रुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, विशेष कार्य अधिकारी डॅा. सुभाष दळवी, मुख्य निवडणूक कार्यालय स्वीप समन्वयक, पल्लवी जाधव, मुंबई महापालिकेचे सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूका जाहीर होण्याआधी प्रत्येक मुंबईकराचा मताधिकार सुनिश्चित व्हावा या हेतूने मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये नवमतदार नोंदणी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबवणार आहे. (Voter Registration Accelerating Special Voter Registration Campaign Mumbai Municipal Corporation will get support)

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी (13 फेब्रुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, विशेष कार्य अधिकारी डॅा. सुभाष दळवी, मुख्य निवडणूक कार्यालय स्वीप समन्वयक, पल्लवी जाधव, मुंबई महापालिकेचे सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीत 18 वर्षावरील नागरिकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच, दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई महापालिकेकडे असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे या मतदारांपर्यंत पोहचण्याचे, अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाकडील उपलब्ध माहिती तपासून मतदार यादीत यादीतील नावांची खात्री करून घेणे, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ आणि होमी भाभा स्टेट विद्यापीठ, यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगर भागातील खाजगी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी समन्वय साधून नवमतदारांच्या नोंदणी वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा : NCP : राष्ट्रवादीचा राज्यसभा उमेदवार ठरेना, दहा जण इच्छूक; महायुतीचं चाललं तरी काय?

- Advertisement -

मोहिमेत महापालिका सहकार्य करेल- आयुक्त

मुंबई महापालिकेशी संलग्नीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संलग्न आरोग्य सेविका, अशा सेविका, महिला स्वयंसहाय्यता गट, महिला बचत गट, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती पातळीवरील कार्यरत संस्था व त्यांचे स्वयंसेवक आणि नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नवमतदार नोदणी विशेष मोहिमेत मुंबई महापालिका सर्वतोपरी सहकार्य करणार, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांनी बैठकीत दिले.

हेही वाचा : जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन डीपीआर बनवावेत-मुख्यमंत्री

सर्व संबंधितांनी निवडणूकीच्या कामाला अधिक प्राधान्य द्यावे, असे निर्देशही आयुक्तांनी यावेळी बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी, मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे,असे सांगून मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -