घरमुंबई'आरेच्या बाबतीत योग्य माहिती घेत आहोत'

‘आरेच्या बाबतीत योग्य माहिती घेत आहोत’

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला टोला

आज मुंबई येथील भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेच्या मुद्यावर चर्चा केली आहे. ‘आरेच्या बाबतीत योग्य माहिती घेत आहोत’, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरेमध्ये होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी २ हजार ७०० झाडे तोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईकर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असताना आज पुन्हा एकदा आरे संदर्भातला मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला.

आरे संदर्भात विरोधकांना टोला

दरम्यान, फडणवीस यांनी आरेला विरोध करणाऱ्यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. ‘कारशेडला विरोध करणारे वेगळ्या मनसुब्याने काम करत आहेत का? हे तपासून पहायला हवे’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

‘कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने राज्याला सर्वाधिक फायदा’

यावेळी त्यांनी केंद्र सरकारे घेतलेल्या विविध निर्णयांचे स्वागत केले. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. कॉर्पोरट टॅक्स कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मागणी सातत्याने आपल्या देशातील अर्थतज्ञही करत होते. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी ट्रे़ड वॉरचा ट्रिपल डाऊन इफेक्ट भारताला परवडण्यासारखा नाही. या निर्णयाचा महाराष्ट्राला मोठा फायदा आहे. गेल्या २ वर्षांत जागतिक कंपन्या महाराष्ट्रात आल्या आहेत. अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरमुळे भारतातील गुंतवणूक वाढत असून २२ टक्क्यांचा सर्वात मोठा फायदा राज्याला देखील होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राणे अजूनही होल्डवर; प्रवेशाबद्दल प्रश्नचिन्ह

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -