घरमुंबईरुळ ओलांडणाऱ्यांना यम घेऊन जाणार

रुळ ओलांडणाऱ्यांना यम घेऊन जाणार

Subscribe

आता रुळ ओलांडणाऱ्यांना चक्क यमराज खांद्यावर उचलून घेऊन जाणार आहे.

कधी कधी एखादी व्यक्ती मोठ्या प्रसंगातून वाचल्यानंतर तोंडातून सहज शब्द येतात की, यमराज समोर होता. मात्र, आता जे पश्चिम रेल्वेचे प्रवासी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतील अशा व्यक्तींच्या समोर साक्षात यमराज असणार आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल. मात्र, हे खरे आहे. कारण आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आरपीएएफचे जवान यमराजच्या वेषात जनजागृती करत आहेत. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीस रुळ ओलांडताना जर त्या यमाने पाहिले तर तो यम त्या व्यक्तीला खांद्यावर उचलून घेऊन जाणार आहे.

- Advertisement -

एका प्रवाशाला यमराजाने खांद्यावर उचलले

पश्चिम रेल्वेच्या आरपीएएफ जवानांनी बुधवारी एक जनजागृती मोहिम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत एका व्यक्तीने यमराजची वेषभूषा करुन रेल्वे रुळ न ओलांडण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे या दरम्यान एका प्रवाशांने रुळ ओलांडला त्या व्यक्तीला या यमराजाने खांद्यावर घेऊन गेला.

पश्चिम रेल्वेने केलेल्या ट्विटनुसार, ‘हे यमराज असून ते नजर ठेऊन जीव वाचवतात. तसेच रूळ ओलांडल्याने उद्भवणाऱ्या धोक्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी ही जागरूकता मोहीम राबवण्यात आली होती’, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – संजय राऊत राज्य तुम्ही चालवा; ‘सामना’ आम्ही चालवतो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -