घरमुंबईमुंबईत ५ ठिकाणी कम्युनिटी फ्रीज! गरजूंना होणार फायदा!

मुंबईत ५ ठिकाणी कम्युनिटी फ्रीज! गरजूंना होणार फायदा!

Subscribe

वर्सोवा वेलफेअर असोसिएशनकडून मुंबईत ५ ठिकाणी कम्युनिटी फ्रीज बसवण्यात आले आहेत.

समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था विविध पद्धतीने काम करत असतात. कुणी कपडे देतं, तर कुणी अन्न देतं. कुणी शिक्षणाची सुविधा देतं तर कुणी निवाऱ्याची व्यवस्था करून देतं. पण वर्सोवा वेलफेअर सोसायटीने एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. या संघटनेनं मुंबईत ५ ठिकाणी ‘कम्युनिटी फ्रीज’ (Community Fridge) म्हणजेच सार्वजनिक फ्रीज बसवले आहेत. या फ्रीजमध्ये अन्न किंवा खाण्याच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच, वर्सोवा वेलफेअर सोसायटीकडून या फ्रीजची देखभाल देखील केली जाते. विशेष म्हणजे, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक गरजू या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत.

मुंबईत ५ ठिकाणी कम्युनिटी फ्रीज

हे कम्युनिटी फ्रीज दिवसाच्या विशिष्ट वेळेत कार्यरत असतात. यामध्ये दुपारी १ ते २.३० या दीड तासाच्या कालावधीमध्ये आणि संध्याकाळी ७ ते ९.३० या अडीच तासाच्या काळात हे फ्रीज कार्यरत असतात. या दरम्यान, रस्त्यावर राहणारे, गरीब, बेरोजगार असे अनेक घटक या फ्रीजमध्ये उपलब्ध असलेले खाण्याचे पदार्थ घेतात. मुंबईत लोखंडवाला, वर्सोवा, ओशिवरा, डीएन नगर आणि मीरा रोड अशा पाच ठिकाणी हे फ्रीज बसवण्यात आले आहेत. आसपासच्या खानावळी, त्या त्या परिसरात रहाणारे नागरिक आणि वर्सोवा वेलफेअर सोसायटीचे सदस्य या फ्रीजमध्ये खाण्याचे पदार्थ ठेवतात.

- Advertisement -

म्हणून बसवले कम्युनिटी फ्रीज!

‘मुंबईत आम्ही एकूण ५ ठिकाणी हे फ्रीज बसवले आहेत. यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे रोज मोठ्या प्रमाणावर वाया जाणारं अन्न वाचवणं आणि अतिरिक्त अन्न गरजूंपर्यंत पोहोचवणं. रस्त्यावर राहणारे, आर्थिकदृष्ट्या शेवटच्या स्थानावर असणारे, गरीब आणि बेरोजगारांना या फ्रीजचा फायदा होईल’, अशी प्रतिक्रिया या फ्रीजची देखभाल करणारे नवीन कुमार मंडल यांनी एएनआयशी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -