घरमहाराष्ट्रअशी झाली यंदाच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

अशी झाली यंदाच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

Subscribe

...आणि डॉ जयंत नारळीकर यांची निवड झाली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची याआधीची प्रक्रिया अतिशय व्यापक स्वरूपाची होती. मात्र पूर्वीच्या तुलनेत आता मात्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. घटक संस्था आणि संलग्न संस्था यांच्या एकत्रित अशा विचाराने संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पार पडते. संमेलन अध्यक्षाच्या नावावर एकमत न झाल्यास मतदान घेण्यात येते. यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना (94th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) च्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत गंगापूर रोड येथील बालाजी लॉन्स येथे साहित्य महामंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये संमेलनाध्यक्षांचे नाव निश्चित करण्यात आले असून अध्यक्षपदासाठी नावावर एकमत न झाल्यास आवाजी मतदानाद्वारे सर्वाधिक पसंती असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे देखील सांगण्यात आले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडीची अशी आहे प्रक्रिया 

नव्या प्रक्रियेत अकराशे जणांऐवजी केवळ १९ जणांकडूनच अध्यक्षाची निवड केली जाते. त्यामुळे या नव्या संमेलनाचा अध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच झाला असल्याचे पाहायला मिळते. यापूर्वी ११०० लोक मतदान करत होते. आता वेळप्रसंगी १९ लोक मतदान करतात. नवीन प्रक्रियेमुळे संस्थांना लॉबिंग करणे सोपे झाले आहे. एका नावावर मतैक्य झाले नाही; तर मतदान घ्यावे लागणार आहे. एका नावाला सर्वांनी होकार दर्शवला; तर निवडणुकीची गरज भासत नाही. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ नागपूर या चार घटक संस्था, तसेच छत्तीसगड, बडोदा, भोपाळ आणि गोवा या चार संलग्न संस्थेसह आयोजक संस्थेच्या माध्यमातून मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पार पडते आणि ठराविक कोट्यातून एका अध्यक्षाची निवड होते.

- Advertisement -

यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना (94th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) च्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत गंगापूर रोड येथील बालाजी लॉन्स येथे साहित्य महामंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये संमेलनाध्यक्षांचे नाव निश्चित करण्यात आले असून अध्यक्षपदासाठी नावावर एकमत न झाल्यास आवाजी मतदानाद्वारे सर्वाधिक पसंती असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे देखील सांगण्यात आले होते.

रविवारी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ नागपूर या चार घटक संस्था; तसेच छत्तीसगड, बडोदा, भोपाळ आणि गोवा या चार संलग्न संस्था, आंध्र प्रदेश व कर्नाटक या समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी आणि संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे बैठकीला उपस्थित होते. रविवारी पत्रकार परिषदेत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची नावाची घोषणा झाली आणि नव्या अध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

…आणि डॉ जयंत नारळीकर यांची निवड झाली

साहित्य महामंडळाच्या घटक संस्था; तसेच संलग्न व समाविष्ट संस्थांकडून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञानवादी लेखक डॉ. बाळ फोंडके, कथाकार भारत सासणे, प्रख्यात लेखिका सानिया, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि लेखक जनार्दन वाघमारे यांच्या नावांचा प्रस्ताव महामंडळाकडे आला होता. संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. दिग्गज नावांमुळे सन्मानाने निवड करताना महामंडळाचा यंदा कस लागला. अंतिम टप्प्यात इतर सर्व नावे मागे पडून संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन वाघमारे यांची नावे विविध साहित्य संस्थांकडून पुढे आली होती. त्यामध्ये नाशिक येथे होणाऱ्या आहमी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची नावाची घोषणा झाली करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ललित अंगाने विज्ञानविषयक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड झाली.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -