घरमुंबईजगभरातील महिलांच्या नोकर्‍या धोक्यात

जगभरातील महिलांच्या नोकर्‍या धोक्यात

Subscribe

नुकत्याच केलेल्या एका रिसर्चमध्ये हे सिद्ध झालंय की जगातल्या प्रत्येक सहाव्या स्त्रीची नोकरी धोक्यात आहे. कन्सल्टन्सी फर्म मॅकिन्जीच्या नव्या रिसर्चप्रमाणे भविष्यकाळात महिलांसाठी नोकरीत 20 टक्के जास्त संधी उपलब्ध आहे. पण येणार्‍या काळाची पावलं ओळखून स्किलमध्ये सुधारणा केली नाही तर नोकरीच्या ठिकाणी स्त्री-पुरुष असमानता नक्कीच वाढेल.

योरस्टोरीमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार भारतात जवळजवळ 1.1 कोटी महिलांची नोकरी जाऊ शकते. नोकरीतली अनेक तंत्र बदलतायत. महिलांना यात स्वत:ला सामावून घ्यावं लागेल. ते त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. आधीच स्त्रिया आपापल्या कार्यक्षेत्रातल्या अनेक अडथळ्यांशी सामना देतायत.

- Advertisement -

’द फ्युचर ऑफ वुमन अ‍ॅट वर्क : ट्रान्सिशन इन द एज ऑफ ऑटोमेशन’ अशा शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यात सांगितलंय की, पुढच्या एक दशकात जगातल्या 10 कोटींपेक्षा जास्त स्त्रियांच्या नोकर्‍या जाऊ शकतात. किंवा त्यांना आपलं क्षेत्र बदलावं लागेलं. या रिसर्चमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, युके, चीन, भारत, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका या दहा मोठ्या अर्थव्यवस्थांवर फोकस केला गेला. ऑटोमेशनमुळे जवळजवळ 10.7 कोटी स्त्रियांची नोकरी जाऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -