घरमुंबई‘हाली’च्या मदतीसाठी श्रमजीवीचा पुढाकार

‘हाली’च्या मदतीसाठी श्रमजीवीचा पुढाकार

Subscribe

अतुलनीय धाडस दाखवून नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून आपल्या बहिणीला वाचवल्याद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार पटकावूनही हलाखीचे जीणे जगणार्‍या हाली बरफचे सक्षमीकरण करण्यासाठी श्रमजीवी संंघटनेने पुढाकार घेतला आहे.
‘शिकवली जाते जिच्या शौर्याची गाथा, तीच झालीय आज हवालदिल माता’, या मथळ्याखाली ‘आपलं महानगर’ने बुधवारच्या अंकात शहापूर येथील राष्ट्रीय शौर्य पुरस्कार पटकावणार्‍या हाली बरफ या आदिवासी विरांगनेची हलाखीची परिस्थिती प्रसिद्ध केली होती.

हालीची ही व्यथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनाही कळली होती.त्यांनी बाळाराम भोईर,विजय जाधव,अशोक सापटे,दशरथ भालके, प्रकाश खोडका या कार्यकर्त्यांना तिच्या घरी पाठवून दिलासा दिला. त्यांनी ताबडतोब तिच्या शिधापत्रिकेचीही व्यवस्था केली.

- Advertisement -

विवेक पंडित यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना हालीला शासकिय मदत मिळवून देण्याची विनंती केली आहे. हालीला शबरी योजनेतून घरकुल मिळवून देण्याच्या हालचालीही आता शासकिय पातळीवर सुरू झाल्या आहेत.तसा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.तसेच हालीच्या रोजगाराची व्यवस्था करण्याबाबत आदिवासी विकास विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.या सुचनांचा पाठपुरावा करून हालीच्या सक्षमीकरणासाठी श्रमजीवीने पुढाकार घेतला आहे.तिचे सक्षमीकरण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे पंडित यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -