घरमुंबईपालिका उद्यानात कंपनी कर्मचाऱ्यांची कामे; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय

पालिका उद्यानात कंपनी कर्मचाऱ्यांची कामे; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय

Subscribe

खासगी कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी लॅपटॉप, मोबाईल घेऊन बसण्यासाठी असलेल्या आसनावर जागा अडवून काम करीत बसतात. त्यामुळे मात्र ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळी यांना बसायला जागा उपलब्ध न झाल्याने त्यांना ताटकळत उभे राहावे लागते.

मुंबई: मुंबई महापालिकेची उद्याने ही महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आदींना विश्रांतीसाठी, बसण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात हिरवळीचा आनंद घेण्यासाठी आहेत. या उद्यानात तरुण, तरुणी हे देखील फेरफटका मारण्यासाठी, व्यायाम व मॉर्निंग वॉकसाठी येतात तर बच्चे कंपनी खेळण्यासाठी येतात. मात्र घाटकोपर (पूर्व), पंतनगर परिसरातील वनिता विकास शाळेजवळील साईनाथ उद्यानात सकाळच्या सुमारास काही खासगी कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी लॅपटॉप, मोबाईल घेऊन बसण्यासाठी असलेल्या आसनावर जागा अडवून काम करीत बसतात. त्यामुळे मात्र ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळी यांना बसायला जागा उपलब्ध न झाल्याने त्यांना ताटकळत उभे राहावे लागते. अन्यथा आल्या पावली मागे परतावे लागते.
याबाबत पालिका उद्यान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडे याबाबत काहीच माहिती नसल्याचे व तक्रार आलेली नसल्याचे समजते. मात्र तरीही वरील घटनाप्रकार अत्यंत चुकीचा असून त्याची गंभीर दखल घेण्यात येणार आहे. पालिका उद्यानात येणाऱ्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना बसण्याच्या जागेवर प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अशा प्रकारे कंपनीचे काम करण्यासाठी आसन अडविणाऱ्यांना उद्यानाची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या माळी, सुरक्षारक्षक यांच्या मार्फत तंबी देण्यात येईल, असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले. (Works of company employees in municipal park Inconvenient to senior citizens and women)

मुंबई महापालिकेची उद्याने ही सामान्य नागरिकांसाठी असून त्यांचा ज्येष्ठ नागरिक, तरुण- तरुणी, महिला आणि बच्चे कंपनी वापर करतात. वास्तविक, मुंबईत एकीकडे उंचच उंच टॉवर उभारले जात असताना त्यामध्ये राहणारे नागरिक, झोपडपट्टीत राहणारे नागरिक वाढती आणि एकूणच वाढती लोकसंख्या पाहता त्या तुलनेत सध्याची उद्याने, क्रीडांगणे, मैदाने यांची कमतरता जाणवत असते. मात्र ज्या ठिकाणी उद्याने आहेत, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळी यांना सकाळच्या सुमारास बसण्यासाठी आसन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ते ताटकळत असतात. सदर उद्यानात खासगी कंपनीचे कर्मचारी हे आपली ऑफिसची कामे घेऊन लॅपटॉपसह आपली कामे जोमात करीत असतात. त्यांना रोखणारे कोणी दिसून येत नाहीत. वास्तविक, उद्यान खात्याच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी गांभीर्याने त्याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित असते. मात्र आता उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून वरीलप्रमाणे होणारे गैरप्रकार रोखण्यात येणार आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: वर्सोवा-विरार Sea लिंकसाठी मिळणार जपानचे सहकार्य; फडवणीसांच्या जपान दौऱ्याचे फलीत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -