घरमुंबईवरळी किल्ल्याला मिळणार नवी झळाळी

वरळी किल्ल्याला मिळणार नवी झळाळी

Subscribe

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

मुंबई येथील वरळी किल्ला सुशोभीकरण करणे व त्याचे सक्षमीकरण करण्याबाबत आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. मुंबई महापालिका, राज्य पुरातत्व संचालनालय आणि पर्यटन विभाग यांच्यामार्फत यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. या बैठकीस माजी राज्यमंत्री सचिन अहीर, माजी आमदार सुनिल शिंदे, नगरसेविका हेमांगी वरळीकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

किल्ल्याचे जतन, संवर्धन करणे तसेच किल्ल्याचे सौदर्यीकरण करण्याच्या अनुषंगाने त्यावर प्रकाशझोत टाकणे (illumination) आदी कामांसाठी दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महापालिका आणि राज्य पुरातत्व संचालनालयामार्फत ही कामे करण्यात येतील. यासंदर्भात पाठपुरावा करुन हा प्रस्ताव मान्य करणे तसेच त्याप्रमाणे किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाची कामे करण्यात यावी, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

- Advertisement -

मंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या वैभवात भर घालू शकणाऱ्या वरळी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. याअनुषंगाने जेट्टी तयार करुन वांद्रे ते वरळी किल्ला बोटसफरही सुरु करता येईल. यातून स्थानिकांना, मच्छिमारांना रोजगार देता येऊ शकेल, असे ते म्हणाले.


Mumbai Corona Update: दिलासादायक! आतापर्यंत १ लाख ७९ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -