घरमुंबईपश्चिम रेल्वेवर बुधवारपासून येणार ‘यात्री ॲप’; लोकलचे लाइव्ह लोकेशन समजणार

पश्चिम रेल्वेवर बुधवारपासून येणार ‘यात्री ॲप’; लोकलचे लाइव्ह लोकेशन समजणार

Subscribe

मुंबई : मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उपनगरीय लोकल गाड्याचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे. पश्चिम रेल्वे प्रवाशांना लोकल गाड्याचे लाइव्ह लोकेशन समजण्यासाठी उद्यापासून (५ एप्रिल) ‘यात्री ऍप’ सुरू करणार आहे. या ऍपवर लोकल गाड्यांचे लाइव्ह ट्रॅकिंग सुविधा उद्यापासून (ता. ५) सुरू होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने यात्री ऍपसाठी लोकल गाड्यांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल गाड्यांचे रिअल-टाइम लाइव्ह लोकेशन समजण्यास मदत होणार आहे. या ऍपमुळे प्रवाशांना एका टचवर लोकलचे लाईव्ह अपडेट्स, वेळापत्रक, प्रमुख रेल्वे स्थानकांचे नकाशे आणि त्यातील सुविधांबाबत माहिती मिळणार आहे. दरम्यान, दिव्यांग प्रवाशांनासुद्धा सदर ऍप वापरता येणार आहे. ते हे ऍप व्हाईस कमांडद्वारे हाताळू शकतात, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

- Advertisement -

लाईव्ह लोकेशनमुळे प्रवाशांना दिलासा
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दोन वर्षांपूर्वी उपनगरी लोकल गाड्यांचे वेळापत्रक आणि लाइव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी ‘यात्री ऍप’ विकसित करण्यात आले होते, मात्र त्यावेळी या ऍपवर केवळ वेळापत्रक दिसत होते. लोकल गाड्यांच्या रिअल टाईम ट्रॅकिंग सुविधा सुरु विकसित झाली नव्हती. गेल्या वर्षी १३ जुलै २०२२ पासून मध्य रेल्वेने ‘यात्री ऍप’वर लाईव्ह लोकेशनची सुविधा सुरू केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानेसुद्धा ‘यात्री ऍप’ सुरू करणार आहे.


पश्चिम रेल्वेवर 12 डब्यांच्या आणखी 11 लोकल
पश्चिम रेल्वेवर जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेकडून आणखी 12 डब्याच्या 11 लोकल उद्यापासून (5 एप्रिल) चालवण्याचा निर्णय घेण्यात येणार आला आहे. त्यामुळे आता एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 1383 वरून 1394 पर्यंत पोहचणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रोज 25 ते 30 लाख प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. या प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या जलद लोकल गाड्या प्रायोगिक तत्त्वावर बोरिवली आणि वांद्रे स्थानकात थांबणार नाहीत. याशिवाय सध्याच्या काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अप मार्गावरील नव्या फेऱ्या
सकाळी 9.40 वा. गोरेगाव – चर्चगेट (धिमी)
सकाळी 10.42 वा. विरार – दादर (जलद)
सकाळी 11.50 वा. गोरेगाव – चर्चगेट (धिमी)
दुपारी 1.53 वा. गोरेगाव – चर्चगेट (जलद)
दुपारी 2.47 वा. विरार – बोरिवली (जलद)

डाऊन मार्गावरील नव्या लोकल
सकाळी 8.38 वा. चर्चगेट – गोरेगाव (धिमी)
सकाळी 10.51 वा. चर्चगेट – गोरेगाव (धिमी)
दुपारी 12.06 वा. दादर – विरार (जलद)
दुपारी 3.23 वा. बोरिवरी – विरार (जलद)
रात्री 9.55 वा. चर्चगेट – वांद्रे (धिमी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -