घरठाणेठाण्यात ठाकरे गटाच्या महिलेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; अद्याप कारवाई नाही

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिलेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; अद्याप कारवाई नाही

Subscribe

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोषणी शिंदे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडच्या कासरवडवली परिसरात ही घटना घडली. ऑफिसचे काम संपवत घरी जात असताना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रोषणी यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोषणी शिंदे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडच्या कासरवडवली परिसरात ही घटना घडली. ऑफिसचे काम संपवत घरी जात असताना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रोषणी यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केला नसल्याचे समजते. याप्रकरणी वैद्यकिय अहवाल मिळाल्यानंतर तपास सरू करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Thackeray group woman beaten up by Shiv Sena Office bearer in Thane No action yet VVP96)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एका फेसबुक पोस्टमुळे शिवसेनेच्या गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रोषणी शिंदे यांना ठाण्यात मारहाण करण्यात आली आहे. संध्याकाळी ऑफिसचे काम संपवत घरी जात असताना ऑफिसच्या आवारात घुसून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याना रोषणी यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे रोषणी या सहा महिन्याच्या गर्भवती महिला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलनही केले.

महिलेला काय झाल्यास सर्वसी जबाबदार मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त – राजन विचारे

- Advertisement -

“एका महिलेला तिच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण केली जाते. चक्कर येईपर्यंत तिला मारहाण करत आहेत. ही आजची सर्वातमोठी काळीकुट्ट घटना आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. पण त्या महिलेला काय झाल्यास त्याची सर्वसी जबाबदारी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची असेल. कारण या दोघांच्या राज्यात असे अत्याचार मागील नऊ महिने सुरू आहे”, असे ठाकरे गटाते खासदार राजन विचारे यांनी सांगितले,

वैद्यकीय अहवाल तपासून कारवाई करू – पोलीस

“रोषणी शिंदे यांना मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार आम्ही कसून चौकशी करू. मारहाणीचा व्हिडीओही आम्हाला दिला आहे. तसेच त्यांचा वैद्यकीय अहवाल तपासून पुढील कारवाई करू”, असे पोलिसांनी सांगितले.

रोशनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रार अर्जामध्ये नेमके काय?

मी टाटा मोटर्स कासारवडवली येथे माझ्या ऑफिसमध्ये कामावर असताना कामावर सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर 15 महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली.

मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युवती सेना म्हणून काम करत आहे. पक्षाच्या प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले होते. परंतु दत्ताराम गवस यांनी माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली. त्यावेळी मी त्यांना प्रत्युत्तर दिलं. जे मी अर्जासोबत जोडलेलं आहे.

मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पत्नीचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले होते. यासंदर्भात माझी चूक नसताना आणि मला भांडण वाढवायचे नव्हते म्हणून सॉरीची पोस्ट केली होती. असं असताना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये काही महिला एकत्र घुसून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्काळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा.


हेही वाचा – धाराशिवमध्ये मविआला मोठा धक्का, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत 25-30 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -