घरताज्या घडामोडीघ्या! निव्वळ पब्लिसिटीसाठी 'दाऊद'ला दिल्या शुभेच्छा आणि शेरा चिकना अडकला!

घ्या! निव्वळ पब्लिसिटीसाठी ‘दाऊद’ला दिल्या शुभेच्छा आणि शेरा चिकना अडकला!

Subscribe

दाऊद इब्राहिमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे डोंगरीतल्या एका तरुणाला जन्माची अद्दल घडली आहे. पण या शुभेच्छा देण्यासाठी त्याने लढवलेली आयडिया पाहून पोलिसांनीही डोक्याला हात मारला!

प्रसिद्धी माणसाकडून काय करवून घेईल, याचा काही नेम नाही. त्याचाच प्रत्यय नुकताच मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणीविरोधी पथकाला आला. डोंगरीचा रहिवासी असलेल्या अझर फिरोज मणियार उर्फ शेरा चिकना या तरुणाने त्याच्या फेसबुक पेजवरून थेट कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. ‘हॅपी बर्थडे बॉस’, असं देखील या पोस्टमध्ये म्हटलं होतं. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये त्याने ‘दाऊद’ असं लिहिलेले केक कापल्याचे फोटो देखील पोस्ट केले होते. त्यामुळे डोंगरीमध्ये दाऊद इब्राहिमचा वाढदिवस साजरा झाल्याचं या पोस्टमधून दिसत होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सूत्र हलवत कारवाई सुरू केली. त्यांनी तपास केल्यानंतर समोर आलेलं वास्तव मात्र त्यांना डोक्याला हात मारायला लावणारं होतं.

‘दाऊद’च्या वाढदिवसाचे फोटो आणि ‘दाऊद’ला शुभेच्छा!

अझर मणियारचं फेसबुकवर शेरा चिकना नावानं अकाऊंट होतं. त्यावरून त्याने दाऊद लिहिलेले केक कापल्याचे फोटो २६ डिसेंबरला पोस्ट केले. त्याखाली हॅपी बर्थडे बॉस असं देखील लिहिलं होतं. नेमका याच दिवशी गँगस्टर दाऊदचा देखील वाढदिवस असतो. त्यामुळे पोलिसांनी लागलीच सूत्र हलवली आणि अझरला ताब्यात घेतलं. त्यावर पोस्टमध्ये टाकलेले फोटो हे दाऊद ईब्राहिमच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे नसून त्याचा वांद्रे येथे राहणारा मित्र दाऊद हाशमी याच्या वाढदिवसाच्या केकचे असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.

- Advertisement -

का टाकले फोटो?

दरम्यान, मित्राचं आणि कुख्यात डॉनचं नाव एकच असल्याचा फायदा घेऊन प्रसिद्धी आणि फेसबुक लाईक्स मिळवण्याचा अझरचा प्रयत्न होता. त्यामुळेच त्याच्या वाढदिवसाचे फोटो दाऊद इब्राहिमच्या वाढदिवशी पोस्ट केल्याचं अझरने पोलिसांना सांगितलं. गेल्या महिन्यातच दाऊद हाशमीचा बीकेसीच्या सिटी पार्क हर्बल शीशा लाँजमध्ये वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आल्याचं देखील पोलिसांच्या तपासात समोर आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -