घरमुंबईशपथविधी सोहळ्यावर घटकपक्ष नाराज; जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे अनुपस्थित राहणार

शपथविधी सोहळ्यावर घटकपक्ष नाराज; जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे अनुपस्थित राहणार

Subscribe

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्यात घटकपक्षातील प्रमुख नेत्यांना निमंत्रणच देण्यात न आल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे चित्र आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात विस्तार होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांसह घटकपक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाले. पण आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्यात घटकपक्षातील प्रमुख नेत्यांना निमंत्रणच देण्यात न आल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे चित्र आहे.

मंत्रिपदं न मिळाल्याने नाराज?

मिळालेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि शेकापचे जयंत पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आजच्या शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार म्हणून मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. पण घटकपक्ष म्हणून निमंत्रण देण्यात न आल्याने महा विकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शेकापचे जयंत पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांसाठी सुद्धा बोलावण्यात आले नाही. तसेच मंत्रिपदापासून डावलण्यात आल्याचे देखील या नेत्यांनी सांगितले.

हेही वाचा – काँग्रेसचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री घेणार शपथ; वाचा यादी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -