घरनवी मुंबईसिवूडस येथे घराचा स्लॅब कोसळला; सिडकोकडे दुरुस्तीची मागणी

सिवूडस येथे घराचा स्लॅब कोसळला; सिडकोकडे दुरुस्तीची मागणी

Subscribe

सिवूडस सेक्टर ४८ येथील सिडको निर्मित सदनिका ज्ञानेश्वर माऊली सोसायटी बी १३/१३ या सदनिकेच्या किचनचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान,मागील पावसाळ्यापासून सिडको निर्मित सोसायटीमधील घरांचा स्लॅब कोसळण्याची ही १५ वी घटना आहे.

बेलापूर : सिवूडस सेक्टर ४८ येथील सिडको निर्मित सदनिका ज्ञानेश्वर माऊली सोसायटी बी १३/१३ या सदनिकेच्या किचनचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान,मागील पावसाळ्यापासून सिडको निर्मित सोसायटीमधील घरांचा स्लॅब कोसळण्याची ही १५ वी घटना असून सिडकोने पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक भरत जाधव यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे केली आहे.
सिवूडस मधील सेक्टर ४८ ,४८ए आणि ४६ मध्ये एकूण ३२ सिडको निर्मित हौसिंग गृहनिर्माण सोसायट्या असून सुमारे ४ हजार त्यात सदनिका आहेत. सदर इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर मागील दहा वर्षांपासून वारंवार कोसळल्याने सिडकोच्या निकृष्ट इमारतीच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यापूर्वी सिडको दुर्घटनाग्रस्त घरांच्या दुरुस्तीचे काम करत होती मात्र मागील वर्षभरापासून आमची मुदत संपली आहे हे कारण पुढे करत दुरुस्तीचे काम करत नव्हती.गत पावसाळ्यात ६ जुलै रोजी सिवूडसमधील दोन सोसायटीतील घरांचा स्लॅब कोसळला त्यानंतर दुर्घटनेच्या घटना सुरूच असून पुन्हा १५ वी घटना सीवूडस सेक्टर ४८ मधील ज्ञानेश्वर माऊली सोसायटीत घडली आहे. शुक्रवारी सकाळी मंगेश कावले यांच्या घरातील स्लॅब कोसळला.

सदनिकेची दुरुस्ती त्वरित करावी
सिडकोच्या निकृष्ठ बांधकामामुळे घराचा स्लॅब कोसळने , भिंतींना तडे जाणे ,प्लास्टर कोसळने आदि घटना मागील १० वर्षांपासून वारंवार घडत आहेत.१० नोव्हेंबर २०२२ पासून सिडकोने स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सदनिका दुरुस्तीची कामे पुन्हा सुरू केली असून ज्ञानेश्वर माऊली मधील पडझड झालेल्या सदनिकेची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी माजी नगरसेवक जाधव यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -