घरनवी मुंबईनवी मुंबई महानगरपालिका उपायुक्तपदी डॉ. राहुल गेठे यांची नियुक्ती

नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्तपदी डॉ. राहुल गेठे यांची नियुक्ती

Subscribe

महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या 28 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त म्हणून डॉ.राहुल गेठे कार्यरत राहणार आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त पदावर सार्वजनिक आरोग्य विभागातील वैदयकीय अधिकारी (गट अ) डॉ.राहुल बी. गेठे यांचे कायम समावेशन करण्याच्या प्रस्तावास राज्यशाासनाने मान्यता दिली असून आता ते नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त पदावर रुजू झाले आहेत.(Dr. Rahul Gethe has been appointed as Deputy Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation)

महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या 28 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त म्हणून डॉ.राहुल गेठे कार्यरत राहणार आहेत.
डॉ.राहुल गेठे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून आपल्या कार्यकुशलतेचा व गतिमान कार्यवाहीचा ठसा उमटवलेला आहे. कोव्हीड प्रभावित काळात नवी मुंबई महानगपालिकेत उपायुकत पदावर कार्यरत राहून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना डॉ.राहुल गेठे यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. विशेषत्वाने इंडिया बुल्स सारखे जंबो कोव्हीड काळजी केंद्र उभारण्यात व ऑक्सिजन उपलब्धता करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. केवळ नवी मुंबई महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्र शासनामार्फत कोव्हीड कालावधीत तळोजा, मुरबाड, चाकण, येथील ऑक्सिजन प्रकल्पांवर सरकारमार्फत पर्यवेक्षक म्हणून डॉ. राहुल गेठे यांनी नियोजनबध्द कार्यवाही केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : झिंगझिंग झिंगाट : दारुच्या तर्रर्र नशेत रेल्वे प्लटफार्मवरच चढवला ऑटो; वाचा- कुठे घडला हा प्रकार

लोहखनिज प्रकल्प पूर्ण करण्यात विशेष भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना गडचिरोलीमध्ये सुरजागड लोहखनिज प्रकल्प पूर्ण करण्यात डॉ.राहुल गेठे यांनी विशेष भूमिका बजावलेली असून गडचिरोलीच्या विकास प्रक्रियेत पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी केलेली आहे. सन 2019 मध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, चिपळूण येथील पूरजन्य परिस्थितीमध्ये त्यांनी तत्पर मदत कार्य केलेले असून, मागील महिन्यातील इर्शाळवाडी आपत्ती प्रसंगातही त्यांनी पूर्णवेळ मदतकार्यात सहभाग घेतलेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : BMCकडून चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानामध्ये 48 देशी प्रजातींच्‍या 10 हजार 264 रोपांची लागवड

प्रतिनियुक्तीच्या कोट्यातून नियुक्ती

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर उपायुक्त संवर्गाची 11 पदे मंजूर असून शासनाकडील प्रतिनियुक्तीच्या कोटयातील 5 उपलब्ध पदांपैकी एका पदावर डॉ. राहुल गेठे यांचे समावेशन करण्यात आलेले आहे. डॉ. राहुल गेठे यांच्या नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर उपायुक्तपदी समावेशनामुळे नवी मुंबई महानगरपालिकेस कायमस्वरुपी उपायुक्त उपलब्ध झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -