घरनवी मुंबईनमुंमपातर्फे विज्ञान प्रदर्शन, रायफल शुटींगमधील गुणवंतांचा सन्मान

नमुंमपातर्फे विज्ञान प्रदर्शन, रायफल शुटींगमधील गुणवंतांचा सन्मान

Subscribe

नवी मुंबई-: नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने गुणसंपन्न विदयार्थी घडविण्यासोबतच त्यांच्यातील अंगभूत गुणांना संधी उपलब्ध करुन देऊन त्यांच्या व्यक्तीमत्व विकासावरही भर दिला जात आहे. या अनुषंगाने विविध कला, क्रीडा प्रकारांप्रमाणेच विज्ञान प्रकल्प स्पर्धांमध्येही नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थी कर्तृत्व गाजविताना दिसत आहेत. ( Like various arts and sports, students of Navi Mumbai Municipal Corporation schools are seen excelling in science project competitions.) नुकत्याच झालेल्या ३१ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत विज्ञान प्रकल्प स्पर्धेमध्ये ३६ जिल्हयांतील ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रकल्पाची नोंदणी झाली होती. त्यामधून ३० प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

महापालिका शाळा क्रमांक ४६, गोठीवली शाळेतील प्रिती राठोड व पल्लवी सोळंके या दोघींनी साकारलेल्या अभिनव प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा महापालिका मुख्यालयातील विशेष समारंभात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

या दोघींनी तयार केलेल्या ‘विल्हेवाट लावता येणारे महिलांचे लघवीचे साधन’ या प्रकल्पाची तालुका पातळीवरुन जिल्हा पातळीवर व पुढे जिल्हा पातळीवरुन राज्य पातळीवर आणि त्यापुढे राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. त्याचप्रमाणे गोठीवली शाळेतीलच अंश शर्मा व विलास गुरव या दोन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘बहुउपयोगी खुर्ची’ या प्रकल्पाची महापालिका स्तरावर महापालिका स्तरावर उत्त्म प्रकल्प म्हणून निवड झाली आहे. त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

रायफल शुटींगमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या नुतन चौधरी व अंशिका प्रजापती या दोन नमुंमपा शाळेतील विद्यार्थीनींना त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ.बाबासाहेब राजळे व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -