घरनवी मुंबईखारघरमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळ्याची जय्यत तयारी

खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळ्याची जय्यत तयारी

Subscribe

महाराष्ट्र भूषण महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे.

पनवेल । महाराष्ट्र भूषण महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे.
रविवारी सकाळी १०.३०च्या सुमारास हा सोहळा होणार आहे. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्य त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी सुमारे २० लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम सुरू आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतूक सुरळीत राहण्यासाठीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात येत आहे. नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. सोहळ्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५० टँकर आणि २ हजार १०० नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधादेखील तैनात करण्यात आली असून ६९ रुग्णवाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरती शौचालये, ४२०० पोर्टेबल शौचालये, कार्यक्रमस्थळी ९ हजार तात्पुरती शौचालये बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४ हजार सफाई कर्मचारी, शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्किंगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

खारघरमध्ये श्रीसदस्यांचा सक्रिय सहभाग
‘दासबोध’ मूलाधार मानत समाज प्रबोधनाचे कार्य करणारे रेवदंडा(जि.रायगड) येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेला ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’  खारघर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात देण्यात येणार आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याने शासनाच्यावतीने जय्यत सुरु आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या श्रीसदस्यांनीही गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग घेतला आहे.कार्यकमासाठी मुंबई, रायगड, ठाणे, पालघरसह राज्यातील विविध भागातून लाखो श्रीसदस्य उपस्थित राहणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -