घरनवी मुंबईइंटकच्या माध्यमातून एनएमएमटी कामगारांची तुर्भे आगारात 'द्वार' सभा

इंटकच्या माध्यमातून एनएमएमटी कामगारांची तुर्भे आगारात ‘द्वार’ सभा

Subscribe

विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले

नवी मुंबई-: 
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात अर्थात एनएमएमटीच्या सेवेत कार्यरत असणार्‍या ठोक मानधन तसेच कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना सोयी-सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियन (इंटक) चे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी परिवहनच्या तुर्भे आगार व्यवस्थापकांकडे लेखी निवेदनातून केली आहे.  (‘Dwar’ meeting of Maharashtra Employees’ Union NMMT workers at Turbe Agar) कर्मचार्‍यांच्या प्रश्नी तुर्भे आगाराच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून द्वार सभेतून प्रशासनाचे लक्ष वेधले.

यावेळी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, परिवहन युनिट अध्यक्ष नितिन गायकवाड,उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, सय्यद इस्माईल, संजय सुतार, जितेश तांडेल इतर ठोक मानधनाचे वाहक-चालक आणि कंत्राटी कामगार उपस्थित होते.

- Advertisement -

परिवहन व्यवस्थापकांना सादर केलेल्या निवेदनात ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांबाबत कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिकेतील सर्व रोजंदारीवरील तसेच ठोक मानधनावरील चालक व वाहक यांना कायम सेवेत समाविष्ट करावे, तो पर्यंत त्यांना ‘समान काम, समान वेतन‘ देण्यात यावे. यासाठी सतत महाराष्ट्र कर्मचारी युनियन (इंटक) ही संघटना परिवहन उपक्रमात स्थापित झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत, तरी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा.) कोरोना या महामारीच्या काळापासून आजची महागाई पाहता कामगारांच्या परिवार व मुलांचे शिक्षण या तुटपुंज्या पगारात होत नसल्याने परिवहननच्या मागील ठरावाप्रमाणे प्रलंबित हजारांची पगार वाढ तात्काळ देण्यात यावी, सर्व ठोक मानधनावरील कर्मचारी गेली १५ ते २० वर्षे झाली सेवा बजावत आहेत. ही बाब विचारात घेता ठोक मानधन आणि आस्थापनावरील कामगारांना सर्व प्रकारचे भत्ते व रजा, वैद्यकीय रजा, अर्जित रजा आणि सर्व सणांच्या रजा लागू करण्यात याव्यात, कोरोना काळापासून कामगारांना अद्याप न मिळालेल्या गणेशाचे तातडीने वाटप करावे, कोरोना काळातील कर्मचार्‍यांचा रखडलेला कोविड भत्ता लवकरात लवकर द्यावा, ठोक मानधनावरील काही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गांवर असून प्रशासनाने त्यांना सेवानिवृत्ती व ठोक मानधन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे,ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांची ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात यावी, या मागण्या केल्या आहेत.

कंत्राटी कामगारां विषयी मागण्यामध्ये सर्व सफाई कर्मचार्‍यांना २०१५ चा एरीयस द्यावा, २०२२-२३ या वर्षातील सफाई कर्मचार्‍यांचे गणवेशाचे कापड आणि शिलाईचे पैसे द्यावेत, सफाई कर्मचार्‍यांना सोयीनुसार ८ रजा मंजूर द्याव्यात, २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट सफाई आणि एनएमएमटीच्या सर्व कर्मचार्‍यांचा सेवा सन्मान करावा, सफाई कर्मचार्‍यांना ‘समान काम,समान वेतन’ द्यावे याचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -