घरपालघरमीरा -भाईंदर क्लस्टरला 10 कोटींचा बुस्टर

मीरा -भाईंदर क्लस्टरला 10 कोटींचा बुस्टर

Subscribe

त्यासोबत पालिकेच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने क्लस्टर योजनेसाठी शहरात सर्वेक्षण सुरु केले आणि प्रत्यक्षात हे काम आता मार्गी लागले आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रात क्लस्टर योजना सुरु करण्याच्या कामासाठी राज्य सरकारने रक्कम १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यासाठी तज्ञ सल्लागार कंपनीची नेमणूक आता केली जात असून पावसाळ्यानंतर क्लस्टर योजनेची प्रत्यक्षात सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे मीरा -भाईंदरमधील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून धोकादायक अनधिकृत इमारती, झोपडपट्ट्या , बैठ्या चाळी यांच्या विकासाला गती मिळणार आहे.
मीरा -भाईंदर शहरात ग्रामपंचायत, नगरपरिषद काळापासून अनेक धोकादायक जुन्या अनधिकृत इमारती असून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना मीरा -भाईंदरमध्ये लागू करावी यासाठी आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडे सतत मागणी केली होती. त्यासोबत पालिकेच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने क्लस्टर योजनेसाठी शहरात सर्वेक्षण सुरु केले आणि प्रत्यक्षात हे काम आता मार्गी लागले आहे.

मीरा -भाईंदर मनपा क्षेत्रात ३२ ठिकाणी समूह विकास योजना राबविण्याची तयारी महापालिकेने केली आहे. ठाण्यात क्लस्टर योजना राबविताना काही अडचणी आल्या त्यातून आम्ही मार्ग काढले, कठीण प्रसंगातून बाहेर पडलो. आता मीरा भाईंदरमधील अनधिकृत झोपड्या, अनधिकृत धोकादायक इमारती यांना विकास करण्याची संधी या क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने क्लस्टर योजनेसाठी सल्लागार नेमणे व इतर प्रशासकीय कामे सुरु करण्यासाठी १० कोटी निधी दिला आहे. यासाठी कामाच्या प्रगतीप्रमाणे राज्य सरकार पुढेही निधी देईल, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

- Advertisement -

 

प्रभावी अंमलबजावणी करू – आयुक्त

- Advertisement -

क्लस्टर योजना राबवत असताना त्यात सर्व पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या सुविधा कशा देता येतील याचे नियोजन आतापासून आम्ही करू. महापालिका सर्व गोष्टींचा विचार करून क्लस्टर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करेल, असे आयुक्त म्हणाले.सध्या क्लस्टर योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी महापालिकेत क्लस्टर सेल समिती गठीत करण्यात आली आहे. या कक्षाकडून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सर्व कामे केली जात आहेत. महापालिकेचा नगररचना , क्लस्टर सोयी सुविधा कक्ष , विधी विभाग असे सर्व मिळून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रितरित्या काम करत आहेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -