घरपालघरकंत्राटी कर्मचार्‍यांचे समायोजन करा

कंत्राटी कर्मचार्‍यांचे समायोजन करा

Subscribe

. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांचे समायोजन करण्याकरिता लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. मात्र, आजपर्यंत पूर्तता झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सफाळे: पालघर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून अतिशय कमी मानधनावर खेड्यापाड्यात व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्यसेविका, सहायिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी इत्यादी कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत आहेत. या सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांचे समायोजन करा, अशा मागणीचे निवेदन खासदार राजेंद्र गावित यांना देण्यात आले आहे.यासंदर्भात सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांच्या कक्षात २० मार्च रोजी बैठक झाली होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांचे समायोजन करण्याकरिता लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. मात्र, आजपर्यंत पूर्तता झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागात गेल्या १७ वर्षापासून कंत्राटी कामगार अल्पशा मानधनावर काम करीत आहेत. महागाईच्या दृष्टिकोनातून तुटपुंजे मानधन परवडत नसल्याची खंत कंत्राटी कामगारांनी यावेळी व्यक्त केली. ओडिसा, पंजाब, राजस्थान, मणिपूर तसेच महाराष्ट्रातील काही भागातील कंत्राटी कर्मचार्‍यांना समायोजनाबाबत शासन निर्णय देण्यात आले. मात्र, पालघर जिल्ह्यात अजूनही कामगारांना समायोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, खासदार गावित यांनी यासंदर्भात लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -