घरपालघरसातबार्‍यावर नाव आले,आभाळ ठेंगणे झाले

सातबार्‍यावर नाव आले,आभाळ ठेंगणे झाले

Subscribe

यावेळी खरा सत्कार करायचा असेलच तर महसूल विभागाचा करा, त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते, असे म्हणत त्यांनी स्थानिक तलाठी साधना चौहान यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

पालघर: पालघर तालुक्यातील नंडोरे-देवखोप ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रातील तांडेलपाडा येथे ११० आदिवासी कुटुंबे पिढ्यानपिढ्या वास्तव्य करून आहेत. मात्र राहत्या घराखालच्या जागेचा सातबारा त्यांच्या नावावर नसल्याने त्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत होते. याकरिता राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती आणि श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे सदर कुटुंबांची नावे सातबारावर आली आहेत. नंडोरे गावातल्या देवखोप येथे त्यांना हे सातबारे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला. ११० आदिवासी कुटुंबांची घराखालील जागेच्या सातबारावर नावे लागली आहेत. यानिमित्त लाभार्थी आदिवासींना सातबारा वाटपाचा कार्यक्रम देवखोप येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी लाभार्थींनी राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांचा नागरिक सत्कार केला. यावेळी खरा सत्कार करायचा असेलच तर महसूल विभागाचा करा, त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते, असे म्हणत त्यांनी स्थानिक तलाठी साधना चौहान यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

गावातल्या रहिवाश्यांनी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी याबाबत श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश पवार आणि सहकार्‍यांना कायदेशीर प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच याबाबत सातत्याने पाठपुरावा देखील केला. त्यामुळे या ११० आदिवासी कुटूंबाच्या घराखालील जागेच्या सातबारावर त्यांची नावे लागली आहेत. यावेळी स्थानिक आमदार श्रीनिवास वनगा, माजी आमदार विलास तरे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा डहाणूच्या प्रकल्पाधिकारी संचिता महापात्रा, जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे, गट विकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, पंचायत समिती सभापती शैला कोलेकर, नगरसेवक रवींद्र म्हात्रे, शिवसेनेचे उपनेते राजेश शहा, सरपंच सोनल घोडके, उपसरपंच रोहन वेडगा, पोलीस पाटील प्रभाकर लडे, माजी उपसरपंच केतन पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -