घरपालघरवर्सोवा-पालघर सी-लिंकसाठी सल्लागाराची नियुक्ती

वर्सोवा-पालघर सी-लिंकसाठी सल्लागाराची नियुक्ती

Subscribe

३ नोव्हेंबर रोजी नितीन गडकरी यांनी वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभानिमित्त केलेल्या विरार दौर्‍यातही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या मागणीचा पुनर्रुच्चार केला होता.

वसईः मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा-विरार सी-लिंकचा पालघरपर्यंत विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी अखेर सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्याचे महत्त्व लक्षात घेता वर्सोवा-विरार सी-लिंकचा विस्तार पालघरपर्यंत व्हायला हवा, अशी मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सातत्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली होती. ३ नोव्हेंबर रोजी नितीन गडकरी यांनी वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभानिमित्त केलेल्या विरार दौर्‍यातही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या मागणीचा पुनर्रुच्चार केला होता.

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या यामागणीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याच क्षणी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांच्या निर्देशानंतर, एमएमआरडीए प्राधिकरणाने वर्सोवा-विरार सी-लिंक पालघरपर्यंत वाढवण्याचे नियोजित केले आहे. एमएमआरडीएने मार्च महिन्यात ४३ किमी लांबीचा वर्सोवा-विरार सी-लिंक बांधण्याकरता ६३ हजार ४२६ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या सी-लिंकमुळे नरिमन पॉइंट आणि पालघरदरम्यानच्य सागरी किनारी रस्त्याला जोडणी मिळणार आहे.

- Advertisement -

या डीपीआरमुळे संरेखन नकाशा आणि या रस्त्यावर बांधण्यात येणारे अंतर्गत रस्ते तयार करण्यास मदत मिळणार आहे. दक्षिण मुंबई आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गादरम्यान प्रवास करताना अंतर्गत रस्ते बायपास करण्यास या सी-लिंकमुळे मदत होणार आहे. त्यातून या महामार्गावर प्रवास करणार्‍या १.२५ लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासोबतच या सी-लिंकमुळे या परिसरातील पर्यटन क्षेत्र पर्यायाने आर्थिक प्रगतीला हातभार लागणार आहे. त्याचमुळे एमएमआरडीएने वर्सोवा-विरार सी लिंक तयार करण्यासाठी तयार केलेल्या योजनांचा पुनरावलोकन आढावा घेण्याकरता सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

नियोजित संरेखन नकाशा योग्य आहे की नाही, प्रकल्पग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनासारखे अडथळे टाळता येतात किंवा पर्यावरणाशी संबंधित आव्हानांवर सहजतेने मात करता येते का, कमी करता येते का, या प्रकल्पात आणखी चांगले पर्याय उपलब्ध आहेत का, हे तपासण्यास या पुनरावलोकन आढाव्यामुळे मदत होणार आहे.

- Advertisement -

 

दररोज ६० हजार वाहनांची क्षमता

पूर्व अभ्यासानुसार, चारकोप, उत्तन, वसई आणि विरार या कनेक्टरसह सी लिंक तयार करण्याचे प्रस्तावित आहे. ४+४ लेनचा मुख्य पूल वर्सोवा आणि विरारला या चार ठिकाणी ३+३ लेन कनेक्टरने जोडण्यात येईल. सी लिंक तयार झाल्यानंतर दररोज ६० हजार वाहने या मार्गावरून धावतील, इतकी याची क्षमता असेल. २०२६ मध्ये वर्सोवा ते विरार प्रवासासाठी कार करता एकेरी टोल एक हजार रुपये असण्याची शक्यता आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स (टीसीई) ने २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत सरकारने आदेश दिलेल्या पूर्वसंभाव्यता अहवालातील पर्यायांच्या आधारे सी लिंक विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -