घरक्राइमMahadev App: सौरभ चंद्राकरवर आता 'या' प्रकरणी गुन्हा दाखल; मुंबई पोलिसांची कारवाई

Mahadev App: सौरभ चंद्राकरवर आता ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल; मुंबई पोलिसांची कारवाई

Subscribe

जुगार, फसवणुकीच्या कलमांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा महादेव अॅपऐवजी खिलाडी हे बेकायदेशीर बेकायदेशीर बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून महादेव बेटिंग अॅप प्रकरण खूप चर्चेत आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी अनेक जणांची या प्रकरणात चौकशी केली आहे. अशातच आता मुंबई पोलिसांनीदेखील महादेव अ‌ॅप प्रकरणातील आरोपी प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्यासह 31 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Mahadev App Case registered against Saurabh Chandrakar in this case Action by Mumbai Police)

जुगार, फसवणुकीच्या कलमांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा महादेव अॅपऐवजी खिलाडी हे बेकायदेशीर बेकायदेशीर बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मांटुग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला असल्याची माहिती आहे.

प्रकाश बनकर यांच्या फिर्यादीवरून माटुंगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 420,467, 468, 471, 120 (ब) आणि जुगार कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनकर यांचा दावा आहे की या आरोपीने खिलाडी बेटिंग अॅप वापरून सरकार आणि इतर अनेक लोकांची 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी अॅपच्या सहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते आणि त्यांनी करोडोंची कमाई केली असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी आता माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

महादेव अॅपप्रकरणी हे सेलिब्रिटी रडारवर

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी टायगर श्रॉफ, सनी लिओनी, आतिफ अस्लम, गायक राहत फतेह अली खान, अली अजगर, गायक विशाल ददलानी, गायिका नेहा कक्कड, एली एवराम, स्टँडअप कॉमेडीयन भारती सिंह, भाग्यश्री, पुलकित, किर्ती खबंदा, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक यांची चौकशी होण्याची असण्याची शक्यता आहे.

काय आहे महादेव अॅप प्रकरण?

बहुतेक सट्टेबाजी व्हॉट्सअॅप नंबरवरून केली जाते आणि एजंट, विविध पॅनल बनवून कमिशन तत्वावर कॉल सेंटर चालवत आहेत. महादेव बुक अॅपचा मुख्य कार्यालय यूएईमध्ये असून ते मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल चालवतात.

केवळ क्रिकेट सट्टेबाजीवरच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर सट्टेबाजीसाठीही या अॅपचा वापर केला जात होता. महादेव बुक अॅपसाठी काम करणारे बहुतेक कर्मचारी छत्तीसगडचे आहेत, जे सौरभ आणि रवी उप्पल यांना ओळखतात आणि ते दुबई आणि युएईमध्ये स्थायिक झाले आहेत.

(हेही वाचा: OBC ना आरक्षण देणाऱ्या अध्यादेशाविरोधीतील याचिकेवर सुनावणी पुढील वर्षांत; सरकारला अल्टिमेटम )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -