घरपालघरसहाय्यक आयुक्तांच्या कारवाईने भातशेतीला जीवदान

सहाय्यक आयुक्तांच्या कारवाईने भातशेतीला जीवदान

Subscribe

त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार शेजारी असलेल्या भातशेतीचे मालक हितेश जनार्दन चौधरी यांनी अनेकदा केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षात त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

वसईः अनधिकृत माती भरावामुळे भातशेती धोक्यात आल्याची तक्रार आल्यानंतर वसई प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी कारवाई केल्याने भातशेतीला जीवदान मिळाले आहे. वसई पश्चिमेकडील उमेळा गावातील सर्व्हे नं.व हिस्सा नं ६५ / ४ अ भातशेती शेजारी सर्व्हे नं ६५/५ या जमिनीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत माती भराव करून सदर जागेवर ६ ते ७ फुट भरणी केली आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार शेजारी असलेल्या भातशेतीचे मालक हितेश जनार्दन चौधरी यांनी अनेकदा केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षात त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी पदाचा भार स्विकारल्यानंतर या जादा भरावावर कारवाई केली. मात्र, राजकीय दबाव आल्याने सदर कारवाई अर्ध्यावर सोडावी लागली. मात्र, संखे यांच्या कारवाईमुळे भातशेती वाचल्याचे हितेश जनार्दन चौधरी यांनी सांगितले. बेकायदा माती भरावाविरोधात अर्धवट राहिलेली कारवाई पुन्हा करण्याचे निर्देश संखे यांना द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisement -

वसई प्रभाग समितीचा कार्यभार हाती घेतल्यानंतर संखे यांनी बंगली बाभोळा येथील अनधिकृत इमारतीत सुरु असलेल्या एका वादग्रस्त बारचे मालक मॅक्वेल मिस्कीटा यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या बारविरोधात मनसेने आंदोलन केल्यानंतर तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात एमआरटीपीची नोटीस बजावली होती. पण, प्रत्यक्षात गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जात होती. पण, संखे यांनी थेट गुन्हा दाखल करून नेत्यांना धक्का दिला आहे. इतकेच नाही तर नायगांव येथील उमेळा येथील बेकायदा शेडसह अनेक बेकायदा बांधकामे, टपर्‍या, खाऊच्या गाड्या जेसीबी लावून तोडून टाकल्याने अनधिकृत बांधकाम करणारे आणि अवैध फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, पेल्हार प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्तपदावर असताना वरिष्ठांच्या कार्यपद्धतीचा पोलखोल करत मोहन संखे अनधिकृत बांधकामाला वरिष्ठांचा वरदहस्त असल्याचे उघडपणे सांगितले होते. परिणामी संखे यांच्यावरच कारवाई करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -