घरपालघरBhayander Rape Case: चिमुरडीवर बलात्कार करणार्‍या आरोपीवर गुन्हा दाखल

Bhayander Rape Case: चिमुरडीवर बलात्कार करणार्‍या आरोपीवर गुन्हा दाखल

Subscribe

पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नवघर पोलीस ठाण्यात स्वतः पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६ व लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२ चे कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

भाईंदर :- भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या चार वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली होती. गेल्या रविवारी ७ एप्रिल रोजी दुपारी खेळताना चिमुरडी ही बाजूला असलेल्या चिकन दुकान गेली होती. मुलगी सलून दुकान असून ती खेळता खेळता नेहमी प्रमाणे बाजूच्या चिकन दुकानात गेली होती.तेव्हा आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.मोहम्मद दराज खान (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात नवघर पोलीस ठाण्यात बलात्कारा सह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले असून पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नवघर पोलीस ठाण्यात स्वतः पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६ व लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२ चे कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात केला आहे. अधिक तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

- Advertisement -

शहरात पालकमंत्री फिरत नसल्याने अनेक वाद विवाद होत आहेत. पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर स्वतः शंभुराजे देसाई हे फिरकत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्त ,स्थानिक आमदार, खासदार आणि पालिका आयुक्तांच्या कामाचा आढावा घेऊन कारवाई केल्यास बर्‍याच घटनांना आळा बसेल,अशा देखील प्रतिक्रिया आहेत.

या प्रकरणानंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच जमावाकडून दुकानांवर हल्ले देखील होण्याची परिस्थिती उद्भवत आहेत. पोलीस प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना शहरातील दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काहीजण करत आहेत. तसेच सोशल मीडियावर मेसेजेस व्हायरल करून विनाकारण शांतता खराब करत आहेत. अशा प्रकारांवर आळा घालण्याचे काम पोलीस प्रशासनाने करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -