घरमुंबईMumbai News : कोस्टल रोड-वरळी सी लिंकला जोडणारा 136 मीटर लांबीचा गर्डर...

Mumbai News : कोस्टल रोड-वरळी सी लिंकला जोडणारा 136 मीटर लांबीचा गर्डर मार्गस्थ

Subscribe

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदतगार ठरणाऱ्या कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक यांना जोडण्यात येणारा 136 मीटर लांबीचा आणि 2 हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर माझगाव डॉक, न्हावा येथून मोठ्या फुटबॉल ग्राउंड आकाराच्या बार्जवरून वरळीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदतगार ठरणाऱ्या कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक यांना जोडण्यात येणारा 136 मीटर लांबीचा आणि 2 हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर माझगाव डॉक, न्हावा येथून मोठ्या फुटबॉल ग्राउंड आकाराच्या बार्जवरून वरळीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. हा गर्डर कोस्टल रोडच्या ठिकाणी दाखल होऊन दोन दिवसात कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक यांना जोडण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. हा गर्डर स्तंभ 7 आणि 9 यांना जोडण्यात येणार असून तो पुढील 100 वर्षे टिकणार आहे. जपानी कोटिंग करण्यात आल्याने हा गर्डर लवकर गंजणार नाही, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोस्टल रोड आणि सी लिंक यांना गर्डरने जोडल्याने मुंबईतील रस्ते वाहतूक कोंडी फुटेल आणि वाहतूक गतिमान होणार आहे. मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पश्चिम उपनगरामधून मंत्रालय, कुलाबा, चर्चगेट, सी. एस. एम. टी. या ठिकाणी ये-जा करण्यात वाहनातील इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. तसेच मुंबईमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 14 हजार कोटी रुपये खर्चून ‘कोस्टल रोड’ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मे महिन्यात संपूर्ण रोड वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोस्टल रोड उभारण्याचे काम 2018 पासून सुरू आहे. त्यासाठी आतापर्यंत 14 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कोस्टल रोडचे काम नियोजित वेळेत पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र मच्छीमार संघटनेने कोस्टल रोड व वरळी सी लिंक जेथे जोडण्यात येत आहे, तेथे दोन स्तंभात 60 मीटर अंतर ठेवल्याने मासेमारी करण्यासाठी बोटींची ये-जा करणे अडचणीचे होणार आहे, असे सांगत आक्षेप घेतला होता. त्यामुळेच सदर दोन स्तंभातील अंतर 120 मीटर इतके वाढविण्यात आल्याने काम लांबले. त्यासाठी 2 हजार मेट्रिक टन वजनाचा आणि 136 मीटर लांबीचा अजस्त्र गर्डर मागविण्यात आला. सदर गर्डर लवकरच कोस्टल रोड आणि सी लिंक यांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक सुसाट होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -