घरक्रीडाIPL 2024 : ...तर रोहित शर्मासाठी मी माझा जीवही धोक्यात घालेन; प्रीती...

IPL 2024 : …तर रोहित शर्मासाठी मी माझा जीवही धोक्यात घालेन; प्रीती झिंटा असं का म्हणाली?

Subscribe

बई इंडियन्सचा माजी कर्णधार अर्थात हिटमॅन रोहित शर्माला पंजाब किंग्जचा भाग बनवण्यासाठी आपला जीवही धोक्यात घालू शकते असे प्रीती झिंटाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जची आतापर्यंतची कामगिरी फारशी खास राहिली नाही. पंजाब किंग्जने आतापर्यंत खेळलेल्या सहापैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत 8 व्या स्थानावर आहेत. अशातच पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटाने आयपीएलच्या पुढील हंगामातील रणनितीबाबत मोठे भाष्य केले आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार अर्थात हिटमॅन रोहित शर्माला पंजाब किंग्जचा भाग बनवण्यासाठी आपला जीवही धोक्यात घालू शकते असे तिने म्हटले आहे. (IPL 2024 Preity Zinta Says I Will Risk My Life For Rohit Sharma)

मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलानंतर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात सर्व काही ठीक नाही आहे. रोहित शर्मा सध्या मुंबईसाठी फलंदाज म्हणून खेळताना दिसत आहे. मात्र तो आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघ सोडू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे मागील सामन्यात  उपलब्ध नव्हता. त्याच्या जागी सॅम करनकडे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र सॅन कनरनच्या नेतृत्वात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटाने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अनेक रोहित शर्माबाबत वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

प्रीती झिंटा म्हणाली की, तिच्या संघाला एका अश्या कर्णधाराची गरज आहे, जो खेळाडूंमध्ये चॅम्पियन बनण्याची मानसिकता आणू शकेल. ही क्षमता पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मामध्ये आहे. आयपीएल 2025 मध्ये रोहितला खरेदी करण्यासाठी मी माझा जीवही धोक्यात घालू शकते. जर रोहित शर्मा मेगा लिलावात उपलब्ध असेल तर मी त्याला नक्कीच खरेदी करेल, असे प्रीती झिंटाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – KKR VS LSG : फिल सॉल्टच्या फटकेबाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सने विजय

मुंबई इंडियन्सने पाच वेळा जिंकले आयपीएल विजेतेपद 

दरम्यान, रिकी पाँटिंगनंतर 2013 च्या आयपीएल हंगामात रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. यानंतर रोहित शर्माने येताच मुंबईला चॅम्पियन बनवले. यानंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियनने मागे वळून पाहिले नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने आतापर्यंत 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -