घरपालघरचिंचोटी-भिवंडी रस्त्यासाठी भूमिपुत्र एकवटले

चिंचोटी-भिवंडी रस्त्यासाठी भूमिपुत्र एकवटले

Subscribe

या कंपनीचा अनधिकृत पद्धतीने चालवण्यात येत असलेला मालोडी टोल नाका बंद करण्यात यावा आणि त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही ग्रामविकास समितीची आहे.

वसईः चिंचोटी-कामण-खारबाव रस्त्यावर मोठाले खड्डे पडल्याने गावकर्‍यांसह वाहन चालक त्रस्त झाले आहेत. यामार्गाचे निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच टोल वसुली बंद करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून आज मंगळवारी (20 फेब्रुवारी) सकाळी कामण नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. चिंचोटी-कामण-खारबांव-अंजूरफाटा-मानकोली या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. आतापर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघातांतील जखमी व मृतांना नुकसान भरपाई देण्यात यावी. या निकृष्ट कामाकरता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार ठरवून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच हा संपूर्ण रस्ता नव्याने सिमेंट काँक्रिटचा बनवण्यात यावा, अशी मागणी परिसरातील भूमिपुत्रांची आहे. याशिवाय सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीचा अनधिकृत पद्धतीने चालवण्यात येत असलेला मालोडी टोल नाका बंद करण्यात यावा आणि त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही ग्रामविकास समितीची आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावकर्‍यांमध्ये प्रचंड रोष आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना दोनवेळा याठिकाणी आणून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली होती. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे लक्ष वेधले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यारस्त्यावरून जात असताना त्यांना व्यथा सांगितली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना जनता दरबारात निवेदन दिले होते. मंत्री संजय राठोड यारस्त्याने जात असताना ग्रामस्थांनी थांबवून त्यांना निवेदन दिले. खराब रस्त्यामुळे अनेक महिलांचे गर्भपात झाले आहेत. त्यामुळे अनेक आंदोलने केली. पण, कार्यवाई होण्याऐवजी आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे कागदोपत्री दाखवले जात असताना प्रत्यक्षात मात्र रस्ता दुरुस्त होत नाही. यात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे. कारण, अनेक बड्यांचे लक्ष वेधूनही रस्त्याचे काम मार्गी लागत नाही. उलट आंदोलनकर्त्यांवरच कारवाई केली जाते, असा आरोप ग्रामविकास समितीचे दिनेश म्हात्रे यांनी केला आहे.

- Advertisement -

पक्ष,क्रिकेट संघ,संस्था आंदोलनात उतरणार

या आंदोलनात सर्वपक्षीय संघटना, सर्व क्रिकेट संघ, सामाजिक संस्था, महिला मंडळे, टेम्पो युनियन, विद्यार्थी आणि प्रवासी व वाहतूकदार सहभागी होणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास समितीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ग्रामविकास समितीच्या माध्यमातून कामण नाका येथे होणार्‍या ‘रास्ता रोको आंदोलनाला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठिंबा दिला आहे. वसईतील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी करण्यात येणार असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -