घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रढोल वाजवताना 'तो' कोसळला, कोणाचेच लक्ष नाही; मात्र पोलिसांमुळे वाचले प्राण

ढोल वाजवताना ‘तो’ कोसळला, कोणाचेच लक्ष नाही; मात्र पोलिसांमुळे वाचले प्राण

Subscribe

नाशिक : नाशिक मध्ये मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणूक पार पडली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता वाकडी बारव येथे मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आलं. सकाळपासूनच मिरवणूक मार्गावर गणेश भक्तांची मोठी गर्दी होती. तसेच 12 हुन अधिक ढोल ताशा पथकांनीही विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. याच दरम्यान एका ढोल वादकला अचानक मिरकी आल्याने तो खाली कोसळला. वेळीच पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेल्याने तो बचावला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

झाले असे की पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ झाला आणि मानाचा पहिला गणपती म्हणजेच नाशिक महानगर पालिकेचा गणपती मार्गस्थ झाला. या गणपतीच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशा पथकाकडून सलामी दिली जात होती. वाकडी बारव पासून काही मीटर पुढे मिरवणूक सरकल्यानंतर एका ढोल वादक अल्पवयीन मुलाला अचानक मिरकी आली आणि तो ढोलसह रस्त्याच्या कडेला कोसळला. त्यावेळी त्याचे शरीर आखडले आणि तो अक्षरशः बेशुद्ध झाला होतो.

- Advertisement -

महानगर पालिकेच्या गणपती मंडळातील किंवा ढोल पथकातील सदस्यांचेही या मुलाकडे लक्ष नव्हते. अत्यंत कठीण प्रसंग त्याच्यावर ओढवलेला असताना मिरवणूक बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्यासह कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि मुख्तार शेख यांनी तात्काळ त्या मुलाला खांद्यावर उचलून घेऊन जात त्याला वेळीच योग्य उपचार केले. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने त्या मुलाचा जीव वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -