घरपालघरबोगस इमारती घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा

बोगस इमारती घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा

Subscribe

यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने सर्वच सरकारी यंत्रणा आणि वित्तिय संस्थांची फसवणुक करण्यात आल्याची तक्रार सिंग यांनी केली आहे.

वसईः बोगस कागदपत्रे तयार करून अनधिकृत इमारती बांधून विकण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांची आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यात अनेक बडे बिल्डर असल्याने याप्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ऑड. राहुल सिंग यांनी केली आहे. सिडको, वसई विरार महापालिकेचे विकास परवानगीचे बनावट कागदपत्रे, महसूल विभागाचे एनए परवानगीचे बनावट कागदपत्रे, संबंधित सरकारी विभागाचे बनावट सही, शिक्के बनवून बिल्डरांनी ग्राहकांना सदनिका विकल्या आहेत. यासदनिकांची उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करून त्याआधारे बँका आणि विविध वित्तीय संस्थांकडून कोट्यवधी रुपयांची कर्जे घेण्यात आली आहेत. आतापर्यंत विरार शहरात ५५ इमारतींचा घोटाळा उघडकीस आला आहे. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने सर्वच सरकारी यंत्रणा आणि वित्तिय संस्थांची फसवणुक करण्यात आल्याची तक्रार सिंग यांनी केली आहे.
घोटाळ्यातील सर्व पैसा हवाला तसेच दुसऱ्यामार्फत खात्यात वर्ग करण्यात आल्याने हा मनी लाँडरींगचा प्रकार आहे. यात सरकारी अधिकारी, बिल्डर आणि काही राजकीय नेत्यांचाही सहभाग आहे. घोटाळा उजेडात आला असला तरी मूळ आरोपी अद्याप मोकाटच आहेत. बनावट आरोपींना उभे करून हा घोटाळा दडपला जाण्याची शक्यता असून त्यात सरकारी यंत्रणा सहभागी होण्याची भितीही सिंग यांनी व्यक्त केली आहे. यासर्व घोटाळ्याची व्याप्ती पाहता सखोल चौकशी होऊन खरे गुन्हेगार ताब्यात येण्यासाठी ईडीमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे,अशी सिंग यांची मागणी आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -