घरपालघरमांडा -भोपिवली- खरीवली रस्त्याचे काम पाडले बंद

मांडा -भोपिवली- खरीवली रस्त्याचे काम पाडले बंद

Subscribe

या सर्वच कामांमध्ये ठेकेदार नियमाप्रमाणे काम करत नसून कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याने काम बंद पडले असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

वाडा : वाडा तालुक्यातील मांडा- भोपिवली- खरीवली या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून दुरावस्था झाली होती. ग्रामस्थांनी शासन दरबारी हेलपाटे मारून अखेर हा रस्ता या वर्षी मंजूर झाला असून या रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. मात्र ठेकेदाराकडून रस्त्याचे काम नियमाप्रमाणे होत नसून हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू केल्याने ग्रामस्थांनी निकृष्ट कामाचा जाब ठेकेदाराला विचारत सोमवार(दि.१९) पासून काम बंद केले असून जोपर्यंत काम दर्जेदार केले जात नाही तोपर्यंत काम चालू न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार व्हावेत म्हणून सरकारने पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्त्यांसाठी भरीव निधी दिला. वाड्यातील ५.२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी १२ लाखांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला गेला. मात्र रस्त्याचे काम करताना ठेकेदार कंपनीने गुणवत्ता राखली गेली नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.
मांडा -भोपिवली- खरीवली रस्त्याच्या ५.२ किलोमीटर अंतरामध्ये सुमारे चार मोर्‍या व एक सेप्टी वॉलचा समावेश आहे. या सर्वच कामांमध्ये ठेकेदार नियमाप्रमाणे काम करत नसून कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याने काम बंद पडले असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

1
या रस्त्यासाठी मोठा निधी मिळाल्याने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व गुणवत्ता पूर्ण व्हायला हवे, मात्र या कामात ठेकेदार कंपनीने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून गुणवत्ता राखलेली नाही. त्यामुळे हे काम आम्ही बंद केले आहे.
– आझाद अधिकारी,उपसरपंच, ग्रामपंचायत खरिवली

- Advertisement -

ग्रामस्थ व ठेकेदार यांची संयुक्त बैठक बोलावून ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण करून नंतर काम सुरू करण्यात येईल.
– विनोद घोलप, शाखा अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

मांडा -भोपिवली- खरीवली या रस्त्याचे काम नियमाप्रमाणे सुरू आहे.
– संदीप ठाकरे, मयूर कन्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -