घरपालघररिसॉर्टमधील तलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

रिसॉर्टमधील तलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Subscribe

याआधी याच रिसॉर्टच्या मालकाचा तरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

नजीम खतीब मनोर : चिल्हार -बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या हद्दीतील मामाचा गाव नामक रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.बेशुद्धावस्थेत त्याला नागझरी नाक्यावरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नाताळ सुट्ट्या आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मयत मुलाचे कुटुंबीय रिसॉर्टमध्ये आले होते.सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. रुद्र देविदास वाडकर (वय.09) असे मयत मुलाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील कासा गावाचा रहिवासी होता. रिसॉर्टमधील तरणतलावात लाइफ गार्ड नसल्याने मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याआधी याच रिसॉर्टच्या मालकाचा तरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

चिल्हार -बोईसर रस्त्यालगत रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहेत. परंतु, रिसॉर्टमधील तरण तलावात जीवरक्षकांची नियुक्ती केली जात नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये पर्यटकांचे बळी जात आहेत. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची मोफत व्यवस्था होत असल्याने रिसॉर्टमधील सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते. मयत मुलाच्या मृत्यू प्रकरणी रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -