घरपालघरकर्णकर्कश आवाज करणारे शहरात तिघेच ?

कर्णकर्कश आवाज करणारे शहरात तिघेच ?

Subscribe

यामुळे दवाखाना शाळा व इतर शासकीय कार्यालयांना त्रास सहन करावा लागतो. मीरा-भाईंदर शहरात "सायलेंट झोनची" सुरुवात करण्याची गरज भासू लागली आहे.

भाईंदर :- मीरा-भाईंदर शहरात गेल्या तीन महिन्यात सायलेंट झोनमध्ये आपल्या वाहनांचे कर्कश हॉर्न वाजवत फिरणार्‍या फक्त तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर शहरात कर्णकर्कश आवाज करणार्‍या गाड्या आणि वाहने जोरात चालवत असताना त्यांच्याकडे वाहतूक विभाग व स्थानिक पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत यामुळे नागरिक खंत व्यक्त करत आहेत.शहरातील काही बेशिस्त वाहन चालक सायलेंट झोनमध्ये देखील आपल्या वाहनांचे कर्कश हॉर्न वाजवत फिरत असतात यामुळे दवाखाना शाळा व इतर शासकीय कार्यालयांना त्रास सहन करावा लागतो. मीरा-भाईंदर शहरात “सायलेंट झोनची” सुरुवात करण्याची गरज भासू लागली आहे.

मीरा -भाईंदर शहरात नो-हॉन्किंग झोन केल्यामुळे शहरातील प्रसुतीगृह रुग्णालयांमध्ये नव्याने जन्माला आलेल्या लहान मुलांना कर्णकर्कश हॉर्नमुळे होणारा त्रास कमी होणार आहे. वाहतूक पोलिसांनी शहराची पाहणी करून ज्या ठिकाणी प्रसुतीगृह व शासकीय रुग्णालये आहेत त्या परिसरात “सायलेंट झोन” बाबत फलक लावावेत जेणे करुन वाहन चालकांना फलक बघून त्या परिसरात हॉर्नचा वापर करायचा नाही आहे याबाबत माहिती मिळेल. शहरातील गोल्डन नेस्ट, बीपीरोड, इंद्रलोक, भाईंदर पश्चिम-पूर्व अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारचे फलक लावण्याची गरज आहे,असे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -