घरपालघरवर्षभरात पाच कोटींहून अधिक रूपयांचा दंड जमा

वर्षभरात पाच कोटींहून अधिक रूपयांचा दंड जमा

Subscribe

काशिमिरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हांडोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे ही वाहतूक पोलीस अशीच कारवाई करत राहतील.

भाईंदर :- काशिमीरा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीचे नियम तोडणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करत पूर्ण वर्षभरात एकूण १ लाख २४ हजार ४७६ केस करत ५ कोटी ८ लाख ९१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच १ हजार ४६१ वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत. सर्वाधिक केस केलेल्या आकडेवारीमध्ये अवैध प्रवासी वाहतूक ३०२ केस करत २७ लाख ९० हजार दंड वसूल करण्यात आला आहे. दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांवर एकूण २४९ केस करत ४ कोटी ९५ हजार ३०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. विना हेल्मेट वाहन चालवणे याच्या २ हजार ३३४ केस करत ८ लाख ५३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. याच बरोबर सर्वात अधिक दंड वसूल करण्यात आला त्यात विदाऊट हेल्मेट, सिग्नलचे पालन न करणे, विरूद्ध दिशेने वाहन चालवने, वाहन चालवताना फोनवर बोलणे, धोकादायकरित्या वाहन चालवणे, नो-पार्किंग, विना सीटबेल्ट व इतर केसेस यांचा देखील समावेश आहे. काशिमिरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हांडोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे ही वाहतूक पोलीस अशीच कारवाई करत राहतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -