घरपालघरबियर शॉपीवरून ग्रामसभेत राडा

बियर शॉपीवरून ग्रामसभेत राडा

Subscribe

या विषयावरून भाजप कार्यकर्ते आणि माजी सरपंचात शाब्दीक चकमक झाली. वादाचे टोक गाठल्याने थेट हाणामारी सुरु होऊन सभागृहात शिवीगाळीसह गोंधळ झाला.

डहाणूः डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत बियर शॉपीला परवानगी देण्याच्या विषयावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीत चकमक होऊ राडा झाला. यावेळी महिलांचीही विशेष सभा बोलवण्यात आली होती. त्यातच हा गोंधळ होऊन थेट हाणामारी झाल्याने सभा गुंडाळावी लागली. चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेसह महिलांची विशेष सभाही आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरंपच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. महिलांची संख्या या सभेत अधिक होती. पाणीपट्टी, घऱपट्टी थकबाकी वसुलीसह मतदार नाव नोंदणी, आधार कार्ड क्रमांक नोंदणी, सरकारी परिपत्रकाचे वाचन असे महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना त्यांना बगल देत बियर शॉपीला परवानगी देण्याचा विषयावर चर्चा सुरु झाल्याने वादाला तोंड फुटले.

याविषयावरून भाजप कार्यकर्ते आणि माजी सरपंचात शाब्दीक चकमक झाली. वादाचे टोक गाठल्याने थेट हाणामारी सुरु होऊन सभागृहात शिवीगाळीसह गोंधळ झाला. त्यामुळे महिलांसह ग्रामस्थांना सभेतून निघून जाणे पसंत केले. हाणामारी आणि गोंधळ वाढतच चालल्याने सभा अध्यक्षांनी सभा गुंडाळून कामकाजच बंद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -