घरपालघरजव्हारमध्ये परतीच्या पावसाने कापणी हंगाम लांबणीवर

जव्हारमध्ये परतीच्या पावसाने कापणी हंगाम लांबणीवर

Subscribe

दिवाळी आली तरी परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत आहे. धान कापणीचा हंगामही धोक्यात आला आहे.

जव्हार : जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये शेती हाच येथील नागरिकांचा पिढी जात व्यवसाय आहे. तालुक्यातील 35 टक्के नागरिक हे अल्पभूधारक आणि शेतमजूर आहेत. या आदिवासी भागामध्ये खरीप हंगामात प्रत्येक हाताला शाश्वत काम मिळत असते. असे असताना निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील बदल या गोष्टीमुळे दरवर्षी शेतकर्‍याच्या हाता – तोंडाशी आलेला घास निसटतो की काय? अशी परिस्थिती निर्माण होत असते. शिवाय यंदा परतीच्या पावसामुळे भात कापणीचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने यंदाच्या वर्षीची या शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. धान्याची कापणी उशिरा झाल्याने आणि राज्य शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावरती नियमित वेळेत धान विक्रीसाठी उपलब्ध न झाल्यास येथील शेतकर्‍यांना नाईलाजास्तव भात कापणी झाल्यानंतर आपले धान्य हे खासगी व्यापार्‍याला विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.दिवाळी आली तरी परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत आहे. धान कापणीचा हंगामही धोक्यात आला आहे.

दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकर्‍यांना व्यापार्‍यांच्या दारात जाण्याशिवाय मार्ग नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू होऊ शकत नसल्याने आणि कापणीचा हंगाम लांबल्याने येथील शेतकर्‍यांना मिळेल त्या भावात खासगी व्यापार्‍याला धान विक्री करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रती क्विंटल तीनशे ते पाचशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. धान व्यापार्‍याकडून आगाऊ पैसे घेऊन व्यापारी सांगेल त्या किमतीत धान विक्री करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत, कारण दिवाळीसाठी मुलाबाळांना कपडेलत्ते कसे खरेदी करून सण देखील साजरा करायचा आहे. धान खरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी अडचणीची ठरत असून वृध्द आणि बाहेरगावी असणार्‍यांना नोंदणी करणे अडचणीचे जात आहे. यासाठी पणन महासंघ लवकरच मोबाइल प विकसीत करणार असल्याचे कळते आहे. हे अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर घरबसल्या मोबाईलवरुन धान खरेदीची नोंदणी करता येणार आहे. असे जव्हार येथील आदिवासी विकास महामंडळ कार्यालयातील धान खरेदी केंद्र विभागातून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -